InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Bharatiya Janata Party

गोधन वाढल्यास शेती, समाजाला फायदा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर  : आपल्या संस्कृतीत गोमातेला पवित्र स्थान आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही. गोमाता ही तिच्या जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला केवळ देण्याचेच काम करते. गोधन आणि पशुधन वाढल्यास शेती, शेतकरी आणि पर्यायाने समाजाला फायदा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.रेशीमबाग येथील डॉ. हेगडेवार स्मारक समितीच्या महर्षी व्यास सभागृहात आयोजित राज्यस्तरीय गोशाळा संमेलनात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जीवजंतू कल्याण…
Read More...

बोंडअळीच्या नुकसान भरपाईचे जाहीर केलेले ३७ हजार ५०० रूपये कधी देणार ते सांगा ?- मुंडे

नागपूर - हे सभागृह खोटे बोलण्यासाठी आहे का ? याच सभागृहात डिसेंबर २०१७ मध्ये जाहीर केलेले कापसाच्या बोंडअळीच्या नुकसान भरपाई पोटी ३७ हजार ५०० रूपये आणि धानावर आलेल्या तुडतुडया रोगाची नुकसान भरपाई कधी देणार ते सांगा आणि नंतरच कामकाज करा असा सवाल करीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला.https://maharashtradesha.com/farmer-munja-gitte-wrote-letter-to-dhananjay-munde-latest-updates/पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या…
Read More...

शिवसेनेनं शिवबंधन नव्हे भाजपचं मंगळसूत्र बांधावे : विखे-पाटील

टीम महाराष्ट्र देशा- नाणार गेलं नाही पण शिवसेनेची अब्रू गेली.. शिवसेनेच्या रूपातली सावित्री त्यांच्याबरोबर आहे म्हणून भाजप वाचली...ते शिवबंधन बांधतात तसं स्वतःच्या गळ्यात भाजपचं मंगळसूत्र शिवसेनेनं बांधावे असा खोचक सल्ला विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील ज्वलंत समस्या आणि सरकारविरोधातील रणनितीवर चर्चा करण्यात आली. उद्यापासून नागपुरात पावसाळी…
Read More...

प्लास्टिक बंदी : मंत्रीमहोदयांनी खाल्ली कागदावरच झुणका-भाकर !

जळगाव :  राज्य सरकारने राज्यात प्लास्टिक, थर्माकोलबंदी लागू  केली आहे. प्लॅस्टिकबंदीचा धसका चक्क मंत्री गिरीश महाजन यांनीही घेतलेला दिसतो. जळगावमध्ये ते शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आले होते. जेवणाच्या वेळेला काही कार्यकर्त्यांनी प्लास्टिकचं ताट आणि चमचे आणले. पण महाजनांनी ते परत नेण्यास सांगत कागदी डिशमध्ये जेवण केलं. पाणी पिण्यासाठीही त्यांनी स्टीलचा ग्लास बोलवला.राज्य सरकारने राज्यात प्लास्टिक, थर्माकोलबंदी लागू करण्यासाठी  काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी शुक्रवारी मुंबई…
Read More...

मोदींना पवारांचे पत्र, पत्रातून मांडल्या साखर कारखानदारांच्या व्यथा

टीम महाराष्ट्र देशा- ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदार यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले आहे. यंदा अतिरिक्त झालेल्या ऊस उत्पादन आणि दराबाबत निर्माण झालेल्या गोंधळाबाबत, तसेच या उद्योगाशी संबंधित इतर समस्यांबाबत मोदींना पत्र लिहून ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांच्या व्यथा मांडल्या आहेत. तसेच, त्यावर योग्य उपाययोजनाही सुचवल्या आहेत.या पत्रात शरद पवार यांनी केंद्र सरकारने ऊस…
Read More...

माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या 21 वर्षांच्या मुलाचं निधन

टीम महाराष्ट्र देशा- माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार बंडारू दत्तात्रेय यांचा २१ वर्षीय मुलगा बंडारू वैष्णव याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. एमबीबीएसच्या तृतीय वर्षांत शिकत असलेल्या बंडारू वैष्णवने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला सिकंदराबाद येथील गुरूनानक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी उशिरा त्याचे निधन झाले.https://twitter.com/ANI/status/999080765156605952बंडारू दत्तात्रय तेलंगणातील सिकंदराबादचे भाजपा खासदार आहेत. मोदी सरकारमध्ये बंडारू दत्तात्रेय हे…
Read More...

यावर्षी जर अंदाज चुकला तर हवामान खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकणार

टीम महाराष्ट्र देशा- कोट्यावधी रुपये शासन हवामान खात्यावर खर्च करते मात्र बऱ्याचदा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत नाही. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजाच्या चुकल्याने हवामान खात्याच्या भरवश्यावर असलेल्या शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा अडचणींचा सामना करावा लागतो.गेल्यावर्षी हवामान खात्याचा अंदाज खरा न ठरल्याने हजारो कोटी रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी जर अंदाज चुकला तर हवामान खात्याच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते गंगांभीषण थावरे यांनी दिला आहे.…
Read More...

एका टीव्ही अभिनेत्रीसाठी मला मंत्रिपद नाकारलं गेलं : शत्रुघ्न सिन्हा

टीम महाराष्ट्र देशा- भाजपचे असंतुष्ट खासदार, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी 'मला कॅबिनेट मंत्रिपदाचं आश्वासन दिलं गेलं होतं. मात्र, एका टीव्ही अभिनेत्रीसाठी ते नाकारलं गेलं,' असं म्हटलं आहे. त्या अभिनेत्रीचे नाव सिन्हा यांनी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्याकडं असल्याचं बोललं जात आहे. राजकारणात उतरण्याचा निर्णय घेणारे दक्षिणेतील दोन सुपरस्टार रजनीकांत व कमल हसन यांना सल्ला देताना शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.नेमकं काय म्हणाले…
Read More...

लबाडी करुन लाटलेली शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिन परत करा, शेतकऱ्याचं धनंजय मुंडेना पत्र

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहणासंबंधी नुकतेच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकावर जाहीर टीका करत आव्हान दिलं होतं. त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारपासून वाचवण्यासाठी लढताना प्राण पणाला लावण्याची घोषणा केली. मात्र शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखविणाऱ्या धनंजय मुंडे यांना एका शेतकऱ्याने लिहलेले पत्र सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनले आहे.हे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.धनंजय मुंडे याचं ट्वीट  …
Read More...

हे सरकार आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घेणार ? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल

टीम महाराष्ट्र देशा : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथील शामराव रामा भोपळे या 68 वर्षीय शेतकर्याने 6 मे रोजी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात हा शेतकरी 90 टक्के भाजला होता नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात या शेतकऱ्याची मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे.शामराव रामा भोपळे यांनी बँक आणि सेवा सहकारी सोसायटीकडून 17 हजार 360 रुपयांचे कर्ज घेतले. त्यांनी शासनाकडे कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज केला परंतु या कर्जमाफीस ते अपात्र ठरले. त्यासोबतच…
Read More...