InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

breaking news marathi

राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेस कार्यकारिणी समितीने फेटाळला

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर नवी दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला. पण काँग्रेस कार्यकारिणीने हा प्रस्ताव एकमताने फेटाळून लावला. काँग्रेसला राहुल गांधींच्या नेतृत्वाची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधीच काँग्रेसचं नेतृत्व करू शकतात, असं सांगत राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेसने फेटाळून लावला.राहुल गांधी यांनी चांगलं काम केल्याची काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांची भावना आहे. विरोधी…
Read More...

5 व्यांदा खासदार झालेल्या ‘या’ महिला खासदाराची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार?

भावना गवळी यांनी केलेल्या विकासकामांचा सकारात्मक परिणाम म्हणून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने पुन्हा एकदा विजय मिळवला. पाचव्यांदा भावना गवळी लोकसभेवर जाणार आहेत. या निवडीनंतर भावना गवळी यांची मंत्रीमंडळाकडे आगेकूच होत आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात भावना गवळींची वर्णी लागणार असल्याचं बोललं जातंय.भावना गवळी यांनी काँग्रेस आघाडीचे माणिकराव ठाकरे यांचा तब्बल सव्वा लाख मतांनी पराभव करून शिवसेनेचा हा गड कायम राखला. तर्कवितर्क आणि अफवांना पूर्णविराम देत, निकाल पूर्णपणे आपल्याकडे झुकवून…
Read More...

राहुल गांधी स्वत:लाच स्वत:चा राजीनामा देतील – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची खिल्ली उडवली. राहुल गांधी स्वत:लाच स्वत:चा राजीनामा देतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. सध्या लोकसभा निकालानंतर काँग्रेसमध्ये हाहाकार सुरु आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीकडे राजीनामा सोपवला, मात्र तो फेटाळण्यात आला.त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता, ते म्हणाले ” प्रत्येकवेळी हरलेल्या व्यक्तीने आत्मचिंतन करणे योग्य असते, राहुल गांधी स्वत:च स्वत:ला राजीनामा देतील. त्यांनी आत्मपरीक्षण केलंच पाहिजे.…
Read More...

राहुल गांधीं बरोबरच अशोक चव्हाण देखील आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता?

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक होत आहे. या बैठकीत निवडणुकीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देऊ शकतात. राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, पी.चिदंबरम, सिद्धरामय्या, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, कॅप्टन…
Read More...

‘काँग्रेसचा पराभव होणे हे दुर्दैव; राहुल गांधींना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची गरज…

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होणे, हे दुर्दैव होते. त्यासाठी राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही, असे मत वायव्य मुंबईतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार संजय निरुपम यांनी व्यक्त केले.लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिल्लीत काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची (CWC) बैठक होत आहे. यावेळी राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा सुरु आहे. मात्र, राहुल यांनी राजीनामा देण्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची पाठराखण…
Read More...

मोदी पुन्हा सत्तेत आल्याचा दाऊद इब्रहिमने घेतला धसका

नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत आल्यामुळे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याने धसका घेतल्याचे समोर येत आहे. त्यामुळे दाऊदने पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. यंदाच्या निवडणुकीत मोदी सरकार पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत आले. त्यामुळे दाऊदला मोठा धक्का बसला. या निकालानंतर दाऊदने तात्काळ 'आयएसआय'च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन याविषयी चिंता व्यक्त केली.या बैठकीत त्यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. दाऊदने नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता आणि…
Read More...

मिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गजांनी मारली दांडी; काँग्रेसमध्ये मतभेद?

काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पण, त्यानंतर देखील काँग्रेसमधील मतभेद काही संपताना दिसत नाहीत. पराभवानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गजांनी दांडी मारली.लोकसभा निवडणूकीत पराभवावर विचारमंथन करण्यासाठी मिलिंद देवरा यांनी बैठक बोलावली. या बैठकीला उर्मिला मातोंडकर, संजय निरूपम आणि प्रिया दत्त या पराभूत उमेदवारांनीच पाठ फिरवली. मुंबईतील पक्ष कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली होती. तर, एकनाथ गायकवाड हे एकमेव नेते या बैठकीला हजर होते.…
Read More...

नाशिकमधील छगन भुजबळ यांचे वर्चस्व धोक्यात?

दिंडोरीमध्ये भारती पवार आणि  नाशिकमध्ये हेमंत गोडसे या दोन उमेदवारांनी नाशिकमध्ये युतीने विजयाचा झेंडा रोवला. नाशिक जिल्हा आणि शहर कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इथे भुजबळ कुटुंबीयांचं निर्विवाद वर्चस्व होतं. यामुळे राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या नाशिकमधून राष्ट्रवादी भुईसपाट झाल्याने भुजबळ यांना हा धक्का मानला जातोय.दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातले नांदगाव आणि येवला हे दोन विधानसभा मतदारसंघ भुजबळांचे हक्काचे म्हणून ओळखले जातात. या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपच्या…
Read More...

पार्थ पवार यांच्या पराभवानंतर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. असाच धक्कादायक निकाल मावळ लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळाला. पार्थ यांच्या रूपाने पवार कुटुंबाला गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या पराभवानंतर आता अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.'जनतेनं दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं मी अभिनंदन करतो. यावेळी लोकांनी पुन्हा एकदा नरेंद्र…
Read More...

महाराष्ट्रातील ‘हे’ दोन प्रतिष्ठीत खासदार मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात…

मोदी 2 या सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. विद्यमान मंत्र्यांपैकी कोण कायम राहतील आणि कोणाला वगळले जाईल, याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि प्रकाश जावडेकर या विद्यमान कॅबिनेट मंत्र्यांचे स्थान नव्या मंत्रिमंडळात निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेकडून दोन कॅबिनेट मंत्रिपदे मागितली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.भूपृष्ठ वाहतूक आणि जलसंपदामंत्री म्हणून गडकरी यांनी अनेक…
Read More...