InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

devendra fadanvis

राहुल गांधी स्वत:लाच स्वत:चा राजीनामा देतील – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची खिल्ली उडवली. राहुल गांधी स्वत:लाच स्वत:चा राजीनामा देतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. सध्या लोकसभा निकालानंतर काँग्रेसमध्ये हाहाकार सुरु आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीकडे राजीनामा सोपवला, मात्र तो फेटाळण्यात आला.त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता, ते म्हणाले ” प्रत्येकवेळी हरलेल्या व्यक्तीने आत्मचिंतन करणे योग्य असते, राहुल गांधी स्वत:च स्वत:ला राजीनामा देतील. त्यांनी आत्मपरीक्षण केलंच पाहिजे.…
Read More...

देशात मोदींच्या बाजूने सायलेंट वेव – मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्रात आमच्या युतीने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. मागच्या वेळीस आम्ही 41 जागा जिंकल्या होत्या. यावेळेस त्याहीपेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. देशात मोदींच्या नेतृत्वात एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले आहे. या देशात मोदीजींच्या बाजूने सायलेंट वेव आहे. देशातील जनता मोदींना निवडून देण्यास तयार असल्याचे दिसून आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.दुष्काळासारख्या समस्यातून आपल्याला युतीचे सरकार बाहेर काढू शकेल असा विश्वास जनतेला आहे. त्यामुळेच आमच्यावर…
Read More...

येत्या विधानसभेला भाजप-शिवसेना युती होणार?

येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार की नाही या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश भाजपच्या बैठकीत कोणताही निर्णय दिलेला नाही. भाजपचे प्रदेश पदाधिकारी, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, संघटन मंत्री यांची पक्षांच्या दादरमधील कार्यालयात बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, पक्षाचे प्रमुख मंत्री उपस्थित होते.येत्या विधानसभा निवडणुकीत युती होण्यासंदर्भात मुख्यमंत्री काय बोलतात या बाबत उत्सुकता होती; पण मुख्यमंत्र्यांनी त्यावर कोणतेही भाष्य केले नाही. लोकसभा निवडणुकीच्या…
Read More...

‘सामना’च्या पहिल्या पानावरील जाहिरातीत उद्धव ठाकरेंच्या बाजूला फडणवीस यांचा फोटो

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या पहिल्या पानावरील जाहिरातीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या वाढदिवसानिमित्तच्या जाहिरातीत मुख्यमंत्री, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत पहिल्या रांगेत दिसत आहेत. शिवसेनेचे इतर मोठे नेते मात्र दुसऱ्या रांगेत आहेत. या जाहिरातीच्या माध्यमातून शिवसेना-भाजप युतीत मुख्यमंत्र्यांचं महत्व आणि ठाकरेंसह विशेषतः मिलिंद नार्वेकर यांच्याशी असलेली जवळीक पुन्हा अधोरेखित…
Read More...

भाजपच्या नेत्यांनी देशभरात घेतल्या तब्बल 1300 सभा, देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या ‘एवढ्या’…

लोकसभा निवडणुकीचा प्रचार काल संपला. या संपुर्ण प्रचारात विजयासाठी भाजप नेत्यांकडून अनेक रोड शो, प्रचार सभा घेण्यात आल्या. भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी तब्बल 1300 सभा घेतल्याची माहिती भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.यामध्ये भाजपचे मुख्यमंत्र्यांनी देखील प्रचारात मागे राहिले नाहीत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही देशभर अनेक सभा घेतल्या.योगी आदित्यनाथ यांनी…
Read More...

शरद पवारांनी घेतली दुष्काळ प्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट

मराठवाड्यात दिवसभर भारनियमन केले जाते आणि रात्री बेरात्री पाण्याचे टँकर आणले जातात. लोक रात्री दोन-तीन वाजता उठून पाणी भरायला जातात. हे तातडीने थांबवा आणि चारा छावण्यांचे दर 119 रुपये करा, अशा मागण्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्या. त्यावेळी  चाऱ्याचे दरही लवकरच वाढवले जातील, राज्यात रात्रीचे टॅँकर कुठेही चालू दिले जाणार नाहीत असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…
Read More...

ममता बॅनर्जी यांना जनता नमविल्याशिवाय राहणार नाही – देवेंद्र फडणवीस

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकत्यामधील रोड शोमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. कार्यकर्त्यांकडून दगडफेक देखील करण्यात आली. या घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी निषेध केला आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नेत्यांच्या सभांना परवानगी नाकारली जात असून, जणू हे राज्य म्हणजे केवळ ममतांची मालकी असे समजून राज्य कारभार हाकला जात आहे. अनेक भाजपा कार्यकर्त्यांच्या पश्चिम बंगालमध्ये हत्या करण्यात आल्या आहेत.या निवडणुकीत सर्वाधिक हिंसाचार हा…
Read More...

‘दुष्काळी परिस्थितीवर येत्या 48 तासात निर्णय घ्या’

कोरड्या पात्रातील गाळ हा “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. पाऊस सुरू होण्यापूर्वी शक्‍यतो मे महिन्यातच याबाबतीत गतीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब 48 तासांच्या आत निर्णय घ्यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी “ऑडिओ ब्रीज सिस्टम’द्वारे या जिल्ह्यातील सरपंचांशी मोबाइलवरून थेट…
Read More...

मराठा विद्यार्थ्यांचा चंद्रकांत पाटलांना फोन; आरक्षणाचा तिढा न सुटल्यास आत्महत्येचा इशारा

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंबंधित तिढा सुटता सुटत नाही, त्यात आता विद्यार्थ्यांचाही संयम सुटू लागला आहे. आरक्षाणासंदर्भातली राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असल्याने विद्यार्थ्यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.डॉ. तात्याराव लहाने, मराठा मोर्चाचे नेते आणि विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलं होतं. यावेळी मराठा समाजाच्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना फोनवरून…
Read More...

दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून राज्याला 2 हजार कोटींची मदत

राज्याच्या दुष्काळी भागातील जनतेला मंगळवारी केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला. केंद्र सरकारने महाराष्ट्राला दुष्काळ निवारणासाठी 2 हजार 160 कोटींची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली.मुख्यमंत्र्यांनी मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले. आतापर्यंत केंद्राने दुष्काळ निवारणासाठी राज्याला 4248.59 कोटी रुपये दिल्याची माहितीही यावेळी फडणवीसांनी दिली. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ, केंद्र सरकारकडून आणखी 2160 कोटी…
Read More...