InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

election news marathi

राहुल गांधीं बरोबरच अशोक चव्हाण देखील आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता?

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक होत आहे. या बैठकीत निवडणुकीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देऊ शकतात. राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, पी.चिदंबरम, सिद्धरामय्या, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, कॅप्टन…
Read More...

‘काँग्रेसचा पराभव होणे हे दुर्दैव; राहुल गांधींना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची गरज…

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होणे, हे दुर्दैव होते. त्यासाठी राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही, असे मत वायव्य मुंबईतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार संजय निरुपम यांनी व्यक्त केले.लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिल्लीत काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची (CWC) बैठक होत आहे. यावेळी राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा सुरु आहे. मात्र, राहुल यांनी राजीनामा देण्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची पाठराखण…
Read More...

नाशिकमधील छगन भुजबळ यांचे वर्चस्व धोक्यात?

दिंडोरीमध्ये भारती पवार आणि  नाशिकमध्ये हेमंत गोडसे या दोन उमेदवारांनी नाशिकमध्ये युतीने विजयाचा झेंडा रोवला. नाशिक जिल्हा आणि शहर कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इथे भुजबळ कुटुंबीयांचं निर्विवाद वर्चस्व होतं. यामुळे राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या नाशिकमधून राष्ट्रवादी भुईसपाट झाल्याने भुजबळ यांना हा धक्का मानला जातोय.दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातले नांदगाव आणि येवला हे दोन विधानसभा मतदारसंघ भुजबळांचे हक्काचे म्हणून ओळखले जातात. या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपच्या…
Read More...

पार्थ पवार यांच्या पराभवानंतर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. असाच धक्कादायक निकाल मावळ लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळाला. पार्थ यांच्या रूपाने पवार कुटुंबाला गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या पराभवानंतर आता अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.'जनतेनं दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं मी अभिनंदन करतो. यावेळी लोकांनी पुन्हा एकदा नरेंद्र…
Read More...

भाजपचा ‘हा’ उमेदवार जिंकला फक्त 181 मतांनी

नरेंद्र मोदींच्या लाटेत विरोधी पक्षांचा पराभव झाला असताना भाजपचे काही उमेदवार पाच लाखांहून अधिक मतांनी निवडून आले आहेत. मात्र, भाजपचा एक उमेदवार असा आहे की, जो फक्त 181 मतांनी जिंकला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार भोलानाथ यांना 488397 मते मिळाली. तर बसपा उमेदवार त्रिभुवन राम यांच्या पारड्यात 488216 मते पडली.उत्तर प्रदेशातील मछली शहर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार भोलानाथ आणि बसपाचे उमेवार त्रिभुवन राम यांच्यात अटीतटीचा सामना रंगला होता. काल मतमोजणी सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत जसजशी आकडेवारी…
Read More...

राजकारण हा काही पोरखेळ नाही; अमेठीतील पराभवानंतर मनेका गांधीचा राहुल गांधीना टोमणा

राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाल्यानंतर भाजपा नेत्या मनेका गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारण हा काही पोरखेळ नाही, अशा शब्दांत मनेका गांधी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.'राजकारण हा काही पोरखेळ नाही. त्यांनी निवडणूक प्रचारात एकही योग्य मुद्दा उचलला नाही. केवळ गाडीत बसून हात उंचावला म्हणजे निवडणूक प्रचार झाला असं होत नाही. राजकारण करायचं तर व्यवस्थित आणि गंभीरपणे करा' असे मनेका गांधी यांनी राहुल गांधी यांना म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनेका यांनी ही टीका…
Read More...

जावई पडल्याचे दु:ख नाही, तेवढे दु:ख चंद्रकांत खैरे पडल्याचे झाले – दानवे

शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांना  31 वर्षांच्या राजकारणात पहिल्यांदाच पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जावई पडल्याचे दु:ख नाही, तेवढे दु:ख चंद्रकांत खैरे पडल्याचे म्हटले आहे. चंद्रक्रांत खैरे यांच्या पराभवानंतर रावसाहेब दानवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.या निवडणुकीत जावई पडल्याचे दु:ख नाही, तेवढे दु:ख चंद्रकांत खैरे पडल्याचे आहे. मी स्वतः भाकित केले होते की चंद्रकांत खैरे निवडून येतील. मात्र, काही राजकीय…
Read More...

‘हा’ नेता होणार सलग 5 व्यांदा ओडिशाचा मुख्यमंत्री

प्रादेशिक पक्षांमध्ये बिजू जनता दलाचा (बीजेडी) समावेश होत असून नवीन पटनाईक सातत्याने निवडून येत आहेत. गेली 19 वर्षे नवीनबाबू ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. यावेळी ओडिशात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. देशात सर्वत्र मोदी नावाची चर्चा असताना ओडिशात नवीन पटनाईक यांनी पुन्हा एकदा बाजी मारली असून सलग पाचव्यांदा ते मुख्यमंत्री होणार आहेत.मोदींच्या लाटेतही ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राज्यातील आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीचा अधिकृत निवडणुक…
Read More...

‘विजयी उमेदवार इम्तियाज जलील आणि विरोधकांना सोडणार नाही’

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जात होता. शिवसेनेचा हा गड तब्बल 20 वर्षांनी खालसा झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांनी अखेर चंद्रकांत खैरे यांना पराभवाची धूळ चाखण्यास भाग पाडले.मात्र, शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी हा पराभव चांगलाच जिव्हारी लागल आहे. खैरेंनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी 'मातोश्री'वर भेट घेतली. आपला पराभव का आणि कसा झाला, याचा अहवाल दिला. 'मातोश्री'वरील बैठक संपल्यावर चंद्रकांत खैरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'विजयी…
Read More...

अमेठी गेली पण वायनाड राखले; राहुल गांधींचा वायनाडमधून विक्रमी मतांनी विजय

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील अमेठीमधून पराभवाचा सामना करावा लागला आहे. असे असले तरी त्यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी मिळवला आहे. वायनाडमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवताना राहुल गांधी यांनी ४ लाख २९ हजार १६१ मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे ही काँग्रेसच्या दृष्टीने तेवढीच एक दिलासादायक बातमी आहे. देशात मोदी वादळापुढे काँग्रेसची धुळधान उडाली आहे. काँग्रेस आघाडीला चांगली कामगिरी करता आलेली नाही. यूपीएला १००चा आकडाही गाठता आलेला नाही.राहुल यांना…
Read More...