InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Execution

मराठा आरक्षण : गडहिंग्लज येथे मराठा संघटनांचा रास्ता रोको

टीम महारष्ट्र देशा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज गडहिंग्लज येथे भारतीय मराठा संघाच्यावतीने प्रांत कार्यलयासमोर गनिमी पध्दतीने रास्ता रोको करून जोरदार घोषणाबाजी केली. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. पोलिसांनाही केवळ आंदोलन बघत बसण्याशिवाय काहीही करता आले नाही. या आंदोलनात युवक व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या :· मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.· मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील…
Read More...

कराड : मराठा समाजाचा मंगळवारी ठिय्या

कराड : रेथे कराड तालुका सकल मराठा समाजाकडून मंगळवार, 24 जुलैला कराड तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. कराडमधील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून राज्य शासनाने त्वरित मराठा समाजाला न्याय देण्याची एकमुखी मागणीही या बैठकीद्वारे करण्यात आली आहे.शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कराडच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या मराठा समाजाबद्दल असलेल्या भूमिकेचा निषेध नोंदवण्यात आला. त्याचबरोबर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेत…
Read More...

मराठा आरक्षण : आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना सोशल मिडीयावर वाहिली जातेय श्रद्धांजली

मुंबई : मराठा समाजातील आमदारांविरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मिडीयाच्या पोस्टमध्ये आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना श्रद्धांजली वाहून मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. याशिवाय सोलापूरमध्ये शनिवारी मुंडण आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तर २५ जुलैला कल्याणमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या सोशल मीडिया टीमने विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. नवी मुंबई समन्वयकांनी गुरूवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन शुक्रवारीही कायम ठेवल्याचे दिसले.मराठा…
Read More...

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही : राज्य सरकार

टीम महाराष्ट्र देशा : मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीवरुन मुंबई हायकोर्टाने फटकारले असतानाच आता राज्य सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही. एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये तशी बंदी असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत दिली.विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्याचा मुद्दा…
Read More...