InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

latest marathi news

देशात भाजप बाजी मारत असताना भाजपचा ‘हा’ मंत्री निवडणूक हरण्याची शक्यता

निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि देशभरात भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. एनडीएचा देशातला आकडा ३४४ पर्यंत गेला आहे. तर यूपीएला शंभरीही गाठता आलेली नाही. भाजपने यशस्वी कामगिरी केली असली तरी त्यांचा राज्यातील एक खासदार आणि मंत्री पराभवाच्या छायेत आहे. चंद्रपूरमधून निवडणूक लढवत असलेले हंसराज अहिर यांना काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी पिछाडीवर टाकलं आहे. मुख्य म्हणजे राज्यात एकाच जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील पिछाडीवर आहेत.महत्त्वाच्या बातम्या…
Read More...

पार्थ पवार तब्बल दीड लाख मतांनी पिछाडीवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार हे तब्बल दीड लाख मतांनी पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरूवातीच्या मतमोजणीत पार्थ पवार मागे असल्याचे दिसत आहे.  श्रीरंग बारणे यांना 481719 तर पार्थ पवार यांना २०४४७६ मते मिळाली आहेत. बारणे यांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुत्र पार्थ पवार यांच्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे या मतदार संघात काय निकाल लागतो याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.पार्थ पवारांच्या उमेदवारीपासूनच हा…
Read More...

अखेर बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर

महाराष्ट्रातील सर्वात चर्चित मतदारसंघ असलेला बारामतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सकाळपासून मागे असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे.सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना मागे टाकत तब्बल 40 हजार मतांनी आघाडी घेतली आहे.२००९च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे या जवळपास साडेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. पण २०१४च्या निवडणुकीत सुप्रियाताईंचे मताधिक्य घटून ते फक्त ७० हजार…
Read More...

शिरूरमध्ये अमोल कोल्हे तब्बल ‘एवढ्या’ मतांनी आघाडीवर

शिरूर मतदारसंघामध्ये युतीचे उमेदवार  शिवाजीराव आढळराव पाटील आणि आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यामध्ये चुरूशीचे लढत पाहायला मिळत आहे. सध्या अमोल कोल्हे 13 हजार मतांनी आघाडीवर आहेत.दोन्ही उमेदवारांमध्ये चुरूशीचे लढत पाहायला मिळत आहे. सकाळपासून अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली असली तरी, त्यांच्या आघाडी कमी होत चालल्याचे पाहायला मिळत आहे.आढाळराव पाटील हे मागील तीन वेळेपासून या मतदारसंघातून निवडणून आलेले आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल कोल्हे त्यांना हरवणार का ? हे पाहणे…
Read More...

व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. मतदान सुरू झाल्यानंतर आधी पाच व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात यावी तसंच फेरफार आढळल्यास त्या विधानसभा मतदारसंघातील सर्व व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला केली होती.‘व्हीव्हीपॅटची पडताळणी करताना जर काही विसंगती आढळली तर सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची पडताळणी केली जावी’., अशी मागणी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधीपक्षांनी केली होती. मात्र ही मागणी आता फेटाळण्यात…
Read More...

विराट कोहली म्हणतो, ‘या’ लोकांसाठी विश्वचषक जिंकायचा आहे

शहीद जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्हाला विश्वचषक जिंकायचा आहे, अशी भावना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली आहे. काल भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लडला रवाना झाली. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराटने ही भावना व्यक्त केली.विराट म्हणाला की, “तुम्हाला अनेक गोष्टींपासून प्रेरणा मिळते. जवानांपासून मिळणारी प्रेरणा ही सर्वात महत्वाची असते. जवान सीमेवर देशाचे रक्षण करतात. त्यामळे त्यांच्यापेक्षा मोठं प्रेरणास्थान इतर कोणतं असूच शकत नाही . जेव्हा भारतीय…
Read More...

नरेंद्र मोदींविषयी पाकिस्तानी जनता म्हणते….

लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार का याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. भारतात निकालाविषयी जेवढी उत्सुकता आहे. तेवढीच उत्सुकता पाकिस्तानमध्ये देखील पाहायला मिळत आहे. मात्र नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, अशीच पाकिस्तानच्या नागरिकांची ईच्छा दिसते.नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत नाही आले पाहिजेत. त्यांनी पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केला’, असं मत लाहोरचे नगरिक शाही अलम यांनी पाकिस्तानी टीव्ही चॅनेलशी बोलताना व्यक्त…
Read More...

द्वेष पसरविण्याचं राजकारण हरणं गरजेचे – कन्हैया कुमार

भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून बिहारच्या बेगुसराय लोकसभा जागेवर निवडणूक लढविणारा कन्हैया कुमारने निकालाबाबत फेसबुकवर एक पोस्ट लिहून जनतेला आवाहन केले आहे. उद्या निवडणुकीत जे व्हायचं असेल ते होईल पण येणाऱ्या काळात समाजात द्वेष पसरविण्याचं राजकारण हरणं गरजेचे आहे. अशा राजकारणामुळे फक्त लोकशाही कमकुवत होणार नाही तर समाजात फूट पडली जाईल.नेत्यांच्या राजकारणामुळे आपापसात भिडणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकदा थंड डोक्याने विचार करावा की मी जे काही करतोय त्याने माझा फायदा किती आणि नुकसान किती आहे. मतभेदाला…
Read More...

धनंजय मुंडेंनी स्वतःच बीडमधील राष्ट्रवादी यशस्वीपणे संपवली – पंकजा मुंडे

धनंजय मुंडेंनी स्वतः काही कमावलेलं नाही. त्यामुळं राष्ट्रवादीच्या मतांचं श्रेय त्यांनी घेऊ नये. जिल्ह्यातील राष्ट्रवादी त्यांनी यशस्वीपणे स्वतःच संपवली आहे, असे म्हणत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.एक्झिट पोलचे आकडे समाधान आणि आनंद देणारे आहेत. आम्ही अंदाज वर्तवले त्याहून चांगले अंदाज देशभरातले दिसत आहेत.असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.पंकजा मुंडे म्हणाल्या की, 2014 नंतर बीड जिल्ह्यात पक्षावर नसेल पण मुंडे साहेबांवर प्रेम करणारांनी त्यांना…
Read More...

वंचित बहुजन आघाडीला सर्वच्या सर्व 48 जागा मिळणार – प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात सर्वच्या सर्व 48 जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.उत्तर प्रदेशमध्ये 40 जागांवर भाजपला फटका बसेल. पश्चिम बंगाल मध्ये भाजप एक आकडी जागांवर येईल., असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या वेळीप्रमाणे राष्ट्रपती भाजपला बोलावतील, पण बहुमत सिद्ध करणं कठीण आहे. राष्ट्रपती कमजोर आहेत.…
Read More...