InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Loksabha Election

संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला सर्वाधिक 352 जागा मिळाल्या तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधा मानावे लागले. यंदाचा निकाल अनेक अर्थाने विक्रमी ठरला आहे. यंदाच्या लोकसभेत सर्वाधिक महिला विजयी झाल्या आहे.यंदा 78 महिला खासदार संसदेत जाणार आहेत. महिला खासदारांमध्ये भाजपा, तृणमूल, बीजू जनता दल या पक्षांमधल्या महिला उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.१९५२ मध्ये महिला खासदार निवडून येण्याचं प्रमाण सर्वात कमी होतं. सोनिया गांधी, हेमा मालिनी, किरण खेर, साध्वी प्रज्ञासिंह या महिला खासदार…
Read More...

राहुल गांधींकडून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, मात्र…

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप काँग्रेस कार्यकारिणीने हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही.दिल्लीत सुरु असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी राजीनामा देतील अशी चर्चा सुरू होती. मात्र अनेक काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये असे मत व्यक्त केले होते.महत्त्वाच्या बातम्या –मोदींनी दिला…
Read More...

शिवसेनेकडून मंत्रीपदासाठी ‘यांना’ मिळू शकते संधी

लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजप युतीला मोठे यश मिळाले. भाजपचा 23 जागांवर तर शिवसेनेचा 18 जागांवर विजय झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 30 मेला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याच बरोबर एनडीएच्या मंत्र्यांची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपप्रणित एनडीएच्या खासदारांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.उद्धव ठाकरे या बैठकीदरम्यान पाच मंत्रीपदं मागणार असल्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून मंत्रीपदासाठी राज्यसभा खासदार अनिल देसाई, कोल्हापूरचे…
Read More...

मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, 30 मे रोजी शपथविधी सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना 16 वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करत, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे काल आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे.यंदाच्या लोकसबा निवडणुकीत भाजप अभुतपुर्व यश मिळाले आहे. भाजपने यंदा 303 जागांवर विजय मिळवला आहे.पंतप्रधान कार्यालयात केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. बैठकीत १६ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅबिनेटची शिफारस राष्ट्रपतींना पाठवण्यात आली, त्या आधारावर १६ वी लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्याची…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या गुजरातला जाणार

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभुतपुर्व यशानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आईचा आशिर्वाद घेण्यासाठी गुजरातला जाणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करत दिली.तसेच आईची भेट घेतल्यानंतर नरेंद्र मोदी हे वाराणसीच्या जनतेचे आभार  मानण्यासाठी परवा काशीला जाणार आहेत.नरेंद्र मोदींनी ट्विट केले की, 'आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या संध्याकाळी गुजरातला जाणार आहे. त्यानंतर माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी परवा सकाळी काशीला जाणार आहे.'…
Read More...

…नाही तर मराठा समाज वंचित आघाडीसोबत जाईल – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2 लाख 83 हजार मते मिळाली होती. मला ही मते मराठा समाजाची मिळाली असल्याचे हर्षवर्धन जाधव म्हणाले.तसेच मराठा आरक्षणाचा कायदा केंद्रात पास केला नाहीतर मराठा समाज विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी सोबत जाईल, असे मत देखील हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.हर्षवर्धन जाधव म्हणाले की, मराठा आरक्षणावरून वंचित आघाडी सोबत जावं ही मागणी मला तळागाळातुन येत आहे. यासाठी भाजप- शिवसेना…
Read More...

भाजपच्या 303 खासदारांमध्ये एकही मुस्लिम खासदार नाही

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकल्या. भाजपने 303 जागा मिळवत बहुमताचा आकडा पार केला आहे. असे असले तरी भाजपच्या 303 खासदारांमध्ये एकही मुस्लिम खासदाराचा समावेश नाही.यंदाच्या निवडणुकीत भाजपने 7 मुस्लिम खासदारांना उमेदवारी दिली होती. मात्र एकाही उमेदवाराचा विजय झालेला नाही.मागील निवडणुकीची तुलना करता यंदा मुस्लिम खासदारांची संख्या वाढलेली आहे. 2014 मध्ये 23 मुस्लिम खासदार संसदेत गेले होते. तर यंदा 27 खासदार संसदेत गेले आहेत. महाराष्ट्रातून एकमेव मुस्लिम खासदार इम्तियाज जलील…
Read More...

कुटुंबात 9 सदस्य, मात्र उमेदवाराला मिळाली 5 मते

लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतात, तर काही उमेदवार अगदी शेवटच्या टप्पात चुरशीच्या लढतीत बाजी मारून जातात. मात्र  पंजाबमधील जालंधर लोकसभा मतदारसंघातील एका उमेदवाराबरोबर रंजक घटना घडली आहे.नितू शुत्तर्ण वाला हे जालंधर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.  मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव स्विकारावा लागला.अपक्ष म्हणून लढलेल्या नितू शुत्तर्ण वाला यांना केवळ पाच मते मिळाली. नितू शुत्तर्ण वाला यांच्या कुटुंबात एकूण 9 सदस्य आहेत आणि त्यांना मतं केवळ 5 मिळाली.…
Read More...

सुजय विखे यांची वडिलांना भाजपमध्ये येण्याची विनंती

महाराष्ट्रात सर्वात जास्त लक्षवेधी असलेल्या अहमदनगर मतदारसंघात भाजप उमेदवार सुजय विखे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. जवळपास पावणे तीन लाख मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पराभव स्विकारावा लागला आहे.काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र असलेल्या सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही जागा प्रतिष्ठेची झाली होती. मात्र अखेर येथे सुजय विखे यांचा विजय झाला.आपल्या विजयानंतर बोलताना राधाकृष्ण विखे पाटलांविषयी सुजय विखे…
Read More...

यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला तब्बल १७ राज्यांमध्ये खातेही उघडता आले नाही

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएचा  350 जागांवर विजय झाला आहे. भाजप स्वबळावर बहुमताचा आकडा देखील पार केला आहे. तर काँग्रेसची मात्र सर्वच ठिकाणी वाईट अवस्था झाली आहे. काँग्रेसप्रणीत युपीएला देशभरात 86 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले आहे.काँग्रेसला देशभरातील तब्बल 17 राज्यांमध्ये खातेही उघडता आलेले नाही. यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, मणिपूर, मिझोराम, ओदिशा, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा,…
Read More...