InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

mayawati

अखिलेश यादव यांचे कॉंग्रेसला समर्थन, मायावतींची भूमिका अस्पष्ट

लोकसभा निवडणुकीत उत्तप्रदेशमध्ये सपा-बसपा गठबंधनने एकत्र जागा लढवल्या.  सपा-बसपाच्या एकत्र येण्याने भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.निकालानंतर गरज पडल्यास काँग्रेसला पाठिंबा देऊ असे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी जाहीर केले आहे. मात्र बसपाच्या अध्यक्षा मायावती यांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे.विरोधी पक्षनेत्यांची आज दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला हजर राहणार नसल्याचं स्पष्ट करत बसपा प्रमुख मायावती यांनी आपले पत्ते गुलदस्त्यात ठेवले आहेत.'कर्नाटक…
Read More...

रामदास आठवलेंनी दिला मायावतींना लग्न करण्याचा सल्ला

बसपा अध्यक्षा मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नीवरून मोदींवर निशाणा साधला होता. मोदींनी आधी आपल्या पत्नीचा सन्मान करावा, असे मायावती म्हणाल्या होत्या. मायावतींच्या या टीकेला आता. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उत्तर दिले आहे.'मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीची चिंता करू नये. त्यांनी स्वत: लग्न करावं', असे प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी मायावतींना दिले आहे. ते वाराणसीमध्ये बोलत होते.तसेच, यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा…
Read More...

‘नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ हा संपूर्ण देशावरचा काळा डाग आहे’

लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या असताना, आता बसपाच्या अध्यक्षा मायावती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरूच आहे. मोदींनी मायावतींच्या मुख्यमंत्री पदावर टीका केली होती.मायावती जितक्या काळ उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री होत्या त्याच्यापेक्षा अधिक काळ मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो., असे मोदींनी वक्तव्य केले होते, त्यावक मायावतींनी उत्तर दिले आहे.गुजरातमधील मोदींचा कार्यकाळ हा केवळ भाजपावरचाच नाही तर संपूर्ण देशावरचा काळा डाग आहे., असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा…
Read More...

संघानेही नरेंद्र मोदींची साथ सोडली आहे – मायावती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती एकमेकांवर जोरादार टीका करताना दिसत आहेत. आता पुन्हा मायावती यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार हे बुडते जहाज असल्याचे या निवडणुकीत दिसत आहे, असे मायावती म्हणाल्या.मायावती म्हणाल्या की, मोदी सरकार हे बुडतं जहाज असल्याचं या निवडणुकीत दिसत आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ सोडली आहे. जनतेच्या वाढत्या विरोधाचाही मोदींना सामना करावा लागत आहे, त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.तसेच, नरेंद्र मोदींनी…
Read More...

“मोदी जर जन्माने मागासवर्गीय असते, तर त्यांना संघाने पंतप्रधान केलं असतं का?”

मोदी जर जन्मानं मागासवर्गीय असते, तर संघानं त्यांना पंतप्रधान केलं असतं का?,असे म्हणत बसपाच्या अध्यक्षा  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे.मायावती यांनी ट्विट केले की, 'मोदींनी महागठबंधनवर केलेला जातीवादाचा आरोप हास्यास्पद आणि अपरिपक्व आहे. जातीवादाचा अभिशाप असलेले पीडित जातीवादी कसे काय असू शकतात? मोदी जन्मानं ओबीसी नसल्यानं त्यांना जातीवादाचा दंश सहन करावा लागलेला नाही. त्यामुळेच ते अशी विधानं करतात,' अशी टीका मायावतींनी केली आहे.पंतप्रधान मोदींनी महागठबंधन जातीवादी…
Read More...

….त्यापेक्षा मी मरणं पसंत करेन – प्रियांका गांधी

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तप्रदेशमध्ये काँग्रेसचे उमेदवार भाजपची मते खातील असे विधान केले होते. यावर बोलताना बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी काँग्रेस आणि भाजप एकाच ताटाच्या दोन बाजू आहेत. काँग्रेसला मत देणं म्हणजे आपलं मत बरबाद करण्यासारखं आहे. काँग्रेस अप्रत्यक्षरीत्या भाजपाला फायदा पोहोचवत असल्याचा आरोप मायावतींनी केला होता.आता यावर प्रियांका गांधी यांनी मायावतींना प्रत्युत्तर दिलं आहे. अशा जहाल विचारधारेशी समझौता करण्या पेक्षा मी मरणं पसंत करेल, असे प्रियांका गांधी…
Read More...

पंतप्रधान मोदींनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही – अरूण जेटली

बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्वतःच्या जातीचा मागास जातीत समावेश करुन घेतल्याचा आरोप केला होता. आता यावर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मायावतींना ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे.अरूण जेटली यांनी ट्विट केले की, 'पंतप्रधानांच्या जातीचा काय संबंध? त्यांनी कधीही जातीचं राजकारण केलेलं नाही. आतापर्यंत त्यांनी फक्त विकासाचं राजकारण केलं आहे.'जातीचं नाव घेऊन जे लोक गरिबांना फसवत आहेत त्यांना यश मिळणार नाही. जातीचं राजकारण करुन त्यांनी फक्त पैसे कमवले आहेत. बसप…
Read More...

“पंतप्रधान हा अखिलेश यादव, मायावती यांच्यासारखा असावा”

पंतप्रधान हा सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा अध्यक्ष मायावती यांच्यासारखा असावा, असे वक्तव्य काँग्रेसचे पाटणा साहिबचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे.काही दिवसांपुर्वीच भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या या वक्तव्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांच्यामध्ये पंतप्रधानपदी काम करण्याची क्षमता आणि गुण आहेत. काम करण्याची तत्परता आहे, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी…
Read More...

निवडणूक आयोगाकडून भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ आणि बसपाच्या नेत्या मायावती यांच्यावर…

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेत्यांकडून आक्षेपार्ह विधान, शिवीगाळ, धमकवणे अशा गोष्टी वारंवार होताना दिसत आहेत. भाजपच्या उमेदवार जयाप्रदा यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका केल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि मुस्लिमांना धमकावल्याबद्दल मेनका गांधी यांच्यावरही बंदी आणण्यात आली आहे.त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर 72 तासांची तर बसपाच्या नेत्या मायावती यांच्यावर 48 तासांची बंदी घातली आहे.मेरठमधील सभेत आदित्यनाथ यांनी मुस्लिमांचा…
Read More...

जे आम्हाला जातीयवादी म्हणतात त्यांच्या तोंडाला खरकट लागलं आहे – रावसाहेब दानवे

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील हेरीटेज गार्डनमध्ये पार पडला , यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मायावती आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केला.रावसाहेब दानवे म्हणाले की, भाजपा आणि शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप मायावती, शरद पवार आणि फारुक अब्दुल्ला करतात. पण ही मंडळी मागील काळात आमच्या पाठिंब्याबर सत्तेत होती. जे आम्हाला जातीयवादी म्हणतात. त्यांच्या तोंडाला खरकट लागलं आहे. ते आमच्या पंगतीत जेवून गेले आहेत, असा टोला भाजपाचे…
Read More...