InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

modi

लोकसभा निवडणुकीसाठी आज अखेरच्या टप्प्यात 59 जागांवर मतदान

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या आणि सातव्या टप्प्यात आज 59 जागांवर मतदान पार पडणार आहे. यामध्ये सात राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे.बिहारमध्ये 8, हिमाचल प्रदेशमध्ये 4, झारखंड 3, मध्य प्रदेशात 8, पंजाब 13, उत्तर प्रदेश 13, पश्चिम बंगाल 9 तर चंदीगड एका जागेवर मतदान पार पडणार आहे. सुमारे दहा कोटी मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.59 जागांवर 918 उमेदवार रिंगणात आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी मतदारसंघात देखील मतदान पार पडणार आहे.तसेच, सनी…
Read More...

मोदी सत्तेत आले तर भारत वर्ल्ड कप हरणार? क्रिकेट चाहत्यांमध्ये रंगल्यात चर्चा

आयपीएल झालं, निवडणूकीची धामधूम संपत आली, आता चर्चा आहे ती वर्ल्ड कपची. 30 मे पासून वर्ल्ड कप सुरू होणाऱ असून या स्पर्धेत यंदा दहा संघ सहभागी होणार आहेत. भारतात सध्या लोकसभेची रणधुमाळी आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता देशातील सरकार आणि भारताची वर्ल्ड कपमधील कामगिरी यांचा संबंध दिसून आला आहे आणि लावला ही गेला आहे. यामध्ये जेव्हा देशात काँग्रेस सत्तेवर होतं तेव्हा तेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला तर ज्यावेळी एनडीए सरकार होतं त्यावेळी भारताला विश्वविजेता होता होता राहिला.भारताने पहिल्यांदा 1983…
Read More...

“मोदी जर जन्माने मागासवर्गीय असते, तर त्यांना संघाने पंतप्रधान केलं असतं का?”

मोदी जर जन्मानं मागासवर्गीय असते, तर संघानं त्यांना पंतप्रधान केलं असतं का?,असे म्हणत बसपाच्या अध्यक्षा  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे.मायावती यांनी ट्विट केले की, 'मोदींनी महागठबंधनवर केलेला जातीवादाचा आरोप हास्यास्पद आणि अपरिपक्व आहे. जातीवादाचा अभिशाप असलेले पीडित जातीवादी कसे काय असू शकतात? मोदी जन्मानं ओबीसी नसल्यानं त्यांना जातीवादाचा दंश सहन करावा लागलेला नाही. त्यामुळेच ते अशी विधानं करतात,' अशी टीका मायावतींनी केली आहे.पंतप्रधान मोदींनी महागठबंधन जातीवादी…
Read More...

पंतप्रधान युद्धनौकांनी फिरत असेल तर त्यात चुकीचे काय? शरद पवारांचा मोदींना सवाल

राजीव गांधी यांनी आयएनएस विराट युद्धनौकेचा वापर कौटुंबिक सहलीसाठी केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.देशाच्या पंतप्रधानाने युद्धनौकेने फिरण्यात गैर काय आहे, असा सवाल पवारांनी मोदींना विचारला.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.मी स्वतः संरक्षण मंत्री होतो. त्यावेळी मी सुद्धा युद्धनौकांनी अंदमानला गेलो होतो. या युद्धनौका सतत…
Read More...

मोदीजी, राजीव गांधीं बरोबरच राफेलच्या विषयावर ही बोला; राहुल गांधींचे आवाहन

'तुम्हाला माझ्याबद्दल बोलायचं आहे. राजीव गांधींबद्दल बोलायचं आहे. अगदी बिनधास्त बोला. पण राफेल प्रकरणात काय झालं, काय नाही झालं हे देखील जनतेला सांगा,' असे आव्हान राहुल गांधींनी मोदींना दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी वारंवार राजीव गांधींवर टीका करत आहेत. या टीकेचा राहुल गांधी यांनी आज सिरसातल्या जनसभेत समाचार घेतला.'पंतप्रधान मोदी केवळ अनिल अंबानी, नीरव मोदींसारख्या 15 उद्योगपतींचं कर्ज माफ करतात. ते फक्त त्यांच्यासाठीच काम करतात. त्यांना गरिबांशी काहीही देणंघेणं नाही,' अशी…
Read More...

‘मोदी हे काही महात्मा गांधी किंवा विनोबा भावे नाहीत, ते एक पक्के कसलेले राजकारणी आहेत’

राजीव गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन अनेकांनी मोदींवर टीका केली. त्यामुळे मोदींची पाठराखण करण्यासाठी शिवसेना पुढे आली आहे. मोदी हे वाटेल ते बोलतात, त्यांना दुसऱ्यांविषयी आदर नाही असे काही जणांचे म्हणणे आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने संयम पाळला पाहिजे हे मान्य, पण संयमाची टाळी एका हाताने वाजत नाही. मोदी हे काही महात्मा गांधी किंवा विनोबा भावे नाहीत. ते एक पक्के कसलेले राजकारणी आहेत असे सामनातून सांगण्यात आले.वीर सावरकरांचा जाहीर अपमान राहुल गांधी यांनी केला. सावरकर आज त्यांची बाजू…
Read More...

‘मोदी हे औरंगजेबचे आधुनिक अवतार आहेत’

नरेंद्र मोदी हे औरंगजेबचे याचा आधुनिक अवतार असल्याची टीका काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केली आहे. ते वाराणसीमध्ये बोलत होते.वाराणसीच्या लोकांनी ज्या व्यक्तीला निवडून दिले, तो व्यक्ती औरंगजेब याचा आधुनिक अवतार आहे. वाराणसीत महामार्गासाठी शेकडो मंदिरं पाडण्यात आली. विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी ५५० रुपये इतके शुल्क आकारले जाते. यावरुन एक स्पष्ट होते की जे औरंगजेब करु शकला नाही ते नरेंद्र मोदी करु शकतात., असे संजय निरूपम म्हणाले.काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी देखील मोदींची तुलना…
Read More...

अमेठी आपल्या कुटूंबाचा अविभाज्य भाग – राहुल गांधी

पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी 6 मे रोजी होत आहे. याआधी राहुल गांधींनी अमेठीवासीयांना एक पत्र लिहिले आहे. अमेठीचे नागरिक आपल्या कुटुंबातील असल्याचे सांगत राहुल यांनी या पत्रात भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.राहुल लिहितात, अमेठीशी माझे नाते भावनात्मक पातळीवर तितकेच बळकट आहे, जितके ते कुटुंबातील सदस्यांसोबत असते. भाजपला असत्य आणि पैशांच्या आधारे निवडणुका जिंकायच्या आहेत, असा आरोप राहुल यांनी केला आहे.तुम्ही मला जी प्रेमाची शिकवण दिली होती, त्याआधारे मी देशाला उत्तरेकडून दक्षिणेकडे,…
Read More...

‘या’ दोघांना कसे हाकलायचे हा भाजपालाही पडलेला प्रश्न आहे – रामदास फुटाणे

या दोघांना कसे हाकलायचे हा भाजपालाही पडलेला प्रश्न आहे अशी खरमरीत टीका ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केली आहे. आपला देश दोन महाभक्तांच्या मुठीत सापडला आहे. हे दोघेजण म्हणजे अहिरावण महिरावण आहेत. ज्यातले एक मोदी आणि दुसरे अमित शाह आहेत असे रामदास फुटाणे यांनी म्हटलं आहे.या अहिरावण महिरावण यांना हाकलण्याची मोठी जबाबदारी साहित्यिकांची आहे असंही फुटाणे यांनी म्हटलं आहे. नंतर काँग्रेसचे राज्य आले तरी त्यांना झोडपून काढू. शेवटी ते म्हणाले की, कवी रंग शोधत राहतील विसंगती शोधत राहतील.हा…
Read More...

…अशा लोकांसाठी मोदी मते मागत असतील तर मोदींना उभं पण करु नका – शरद पवार

शरद पवारांनी मालेगाव स्फोटाप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूरवर निशाणा साधला. “मशिदीत जाऊन कोणी असं करणार नाही. कारण ज्या दिवशी बॉम्बस्फोट झाला ती ‘शब ए बारात’ची रात्र होती. पोलिसांच्या चौकशीत साध्वीचं नाव आलं, त्यांना अटक केली. मात्र भाजपने साध्वीला सोडलं आणि निवडणुकीत तिकीटही दिलं. साध्वीने बाबरी मस्जिद पाडण्यात हात असल्याचं कबुल केलं. अशा लोकांसाठी मोदी मत मागत असतील तर त्यांना उभं करु नका”, असे पवार म्हणाले.ईशान्य मुंबईचे महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या…
Read More...