InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

mohan joshi

पुण्याचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशींसाठी अजित पवारांनी केला रोड शो

पुणे लोकसभा मतदारसंघाचं तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या मतदारसंघात महायुतीकडून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली असून, दुसरीकडे बापट यांच्याविरोधात महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. बापट यांचा जोरदार प्रचार सुरू असताना, आता मोहन जोशी यांनी देखील काल रोड शो करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वडगावशेरी भागात मोहन जोशी यांच्यासाठी रोड शो केला. यावेळी अजितपवारांसोबतच काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, उमेदवार मोहन जोशी तसेच…
Read More...

मोहन जोशी यांचा ‘स्वत:च्याच पायावर धोंडा’, फेसबूक व्हिडीओमुळे ट्रोल

‘गुलाल किती उरला रे? पोतभर. काय सांगतो? हो काय करणार आता मिरवणुकीत पहिल्यासारखी  मजाच नाही राहिली राव?’ अशा आशयाचा गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचा संवाद असणारा व्हिडिओ आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी सोशल मीडियावर टाकला खरा पण हा  व्हिडिओ त्यांच्या चांगलाच अंगलट आला. गणेशमंडळांचा कैवार घेऊन  मतांची गोळाबेरीज करू पाहणाऱ्या जोशी यांना फेसबूकवरून नेटीझन्सने प्रचंड ट्रोल केले. पुरोगामी पक्षाला हिंदू सणांचा आताच पुळका कसा येतो? असा प्रतिसवाल नेटीझन्सकडून विचारला गेल्याने  मोहन जोशी यांना  ‘स्वत:च्या…
Read More...

पुण्यात भाजप उमेदवार गिरीश बापट यांची वरचढ

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसकडून मोहन जोशी यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. गिरीश बापट विरूध्द मोहन जोशी अशी ही लढत चुरशीची ठरणार आहे.भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा जुनी असल्याने राज्यात मंत्री झाल्यानंतरही त्यांनी आधीच लोकसभेची तयारी सुरू केली होती. त्यामुळे त्यांनी पुण्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर त्यांच्या कार्यकाळात विशेष भर दिला. आपल्या कार्यकाळात केलेल्या कामेच घेऊन, बापट लोकांपर्यंत जात…
Read More...

काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी फिरवली मोहन जोशींच्या प्रचारसभेकडे पाठ; बापटांना मात्र पक्षाची साथ

निवडणूक लोकसभेची असो वा महानगरपालिकेची पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पहायला मिळायचा. मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी पुण्यातील प्रचाराकडे पाठ फिरवल्याचे पहायला मिळतंय. त्यामुळे काँग्रेस भवनमध्ये सध्या शुकशुकाट असल्याचे चित्र आहे.आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडूनही पुण्यात लोकसभेसाठीची कोणती प्रचार यंत्रणा कार्यरत असल्याचे पहायला मिळत नाही. मागील दोन आठवड्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांच्या…
Read More...

पुण्यात काँग्रेसचा स्वतंत्र जाहीरनामा खऱ्याखुऱ्या चौकीदारांच्या हस्ते प्रकाशित

लोकसभेसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रकाशित केला असताना, आता पुण्यात काँग्रेसने आपला स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित केला आहे.विशेष म्हणजे खऱ्याखुऱ्या चौकीदाराच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं.महात्मा फुले वाड्यात सामान्य नागरिकांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. पुण्यातीस काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी पुणेकरांसाठी जाहीरनामा सादर केला.या जाहीरनाम्यात प्रत्येकाल रोजगार, महिला सुरक्षितता, पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ आदी बाबींचा समावेश आहे.महत्त्वाच्या…
Read More...

बहुचर्चित ‘पुष्पक विमान’चा टीझर रिलीज

टीम महाराष्ट्र देशा : सुबोध भावेचा बहुचर्चित सिनेमा 'पुष्पक विमान'चा टीझर रिलीज झाला. अभिनेता, निर्माता आणि लेखक अशा तीनही जबाबदाऱ्या सुबोध भावेने 'पुष्पक विमान' या सिनेमात पार पाडल्या. ‘कट्यार काळजात घुसली’ नंतर सुबोध भावे पुन्हा एकदा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. 'पुष्पक विमान'बाबत प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा सिनेमा आजोबा आणि नातवाची गोष्ट आहे. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या सिनेमात अभंगगीतांचे नवे प्रयोग पाहायला मिळणार आहेत.…
Read More...

हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धा १३ नोव्हेंबर पासून

नागपूर महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 57 व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. नागपुरातील सायंटिफीक सभागृहात आयोजित या स्पर्धेमध्ये नागपूर केंद्रातून 21 नाट्यसंघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत भंडारा आणि नक्षतग्रस्त गडचिरोली येथील संघांचाही समावेश आहे,आगामी १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता विश्‍वोदय बहुउद्देशीय जनकल्याण संस्थेद्वारे सादर होणार्‍या 'नजरकैद' नाटकाद्वारे स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर…
Read More...