InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

pankaja munde

धनंजय मुंडेंनी स्वतःच बीडमधील राष्ट्रवादी यशस्वीपणे संपवली – पंकजा मुंडे

धनंजय मुंडेंनी स्वतः काही कमावलेलं नाही. त्यामुळं राष्ट्रवादीच्या मतांचं श्रेय त्यांनी घेऊ नये. जिल्ह्यातील राष्ट्रवादी त्यांनी यशस्वीपणे स्वतःच संपवली आहे, असे म्हणत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.एक्झिट पोलचे आकडे समाधान आणि आनंद देणारे आहेत. आम्ही अंदाज वर्तवले त्याहून चांगले अंदाज देशभरातले दिसत आहेत.असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.पंकजा मुंडे म्हणाल्या की, 2014 नंतर बीड जिल्ह्यात पक्षावर नसेल पण मुंडे साहेबांवर प्रेम करणारांनी त्यांना…
Read More...

दुष्काळ प्रश्नी मंत्रिमंडळाची लवकरच पार पडणार मराठवाड्यात बैठक

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन तेथेच तात्काळ निर्णय व्हावेत याकरता ही बैठक मराठवाड्यात घ्यावी, अशी मागणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना व्यक्तिश: विनंती करू, ते सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. दुष्काळी आढाव्याची बैठक मराठवाड्यात व्हावी, अशी सर्वांचीच भावना असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील भीषण दुष्काळ, तीव्र…
Read More...

मराठवाड्यातील दुष्काळ सदृश प्रश्नी पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सिंचन अनुशेष आणि पाण्याची तूट भरून काढण्यासाठी मराठवाड्याला राज्यातील अन्य धरणांतून पाणी द्यावे, तसेच अनुशेष अनुदान तातडीने देऊन दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.येत्या दहा वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील सिंचन सरासरी बरोबर येण्यास, मराठवाड्याला 150.185 टीएमसी पाणी इतर खोऱ्यातून स्थलांतरीत करणे आवश्यक आहे.मराठवाड्याचा 8.4 टक्के भाग कृष्णा खो-यात येत असल्यामुळे उस्मानाबाद व बीड…
Read More...

मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण दिलेे, शरद पवारांनी केवळ जाती-जातीत विषच कालवले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘पगडीवाले’ म्हणून हिणवणाऱ्या शरद पवारांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, मात्र तेच काम ‘पगडीवाल्या’ मुख्यमंत्र्यांनी करून दाखवले, शरद पवारांनी केवळ जाती-जातीत विषच कालवले, असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला.आपला भाऊ कधीकधी मी गोपीनाथ मुंडे यांच्या मुळेच आहे, असे सांगतो, तर कधी मुंडे यांनी मला मोठे होऊ दिले नाही असेही म्हणतो. त्याला नेमके काय म्हणायचे हे एकदा त्याने ठरवून घ्यायला हवे. वारसा केवळ मुलगाच चालवतो असे काही नसते. मुलीसुद्धा सक्षमपणे वारसा चालवतात,…
Read More...

आणखी एका चुलत भावाने पंकजा मुंडेंची सोडली साथ; यापुढे धरणार राष्ट्रवादीचा हात

पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ रामेश्‍वर मुंडे यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. रामेश्वर मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीत मतदानाच्या तोंडावर चुलत भावाने धनंजय मुंडेंचा हात पकडल्याने, पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.रामेश्वर मुंडे हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे दिवंगत बंधू व्यंक्टराव मुंडे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी भाजपचे युवानेते म्हणून काम पाहिलं. ते आजपर्यंत पंकजा मुंडेंच्या पाठिशी उभे होते.“भाजपामध्ये माझे आणि कार्यकर्त्यांचे कोणतंच काम होत नाही.…
Read More...

छत्रपती संभाजी राजेंनी सांगितले मुंडे बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे कारण

माझ्या मुलींकडे लक्ष द्या असे गोपीनाथ मुंडेनी सांगितले होते. मुंडे साहेबांवरील प्रेमापोटी आणि आदरापोटी मी माझ्या दोन्ही बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे सांगत छत्रपती संभाजी राजे यांनी मुंडे कुटूंबाप्रती आपुलकी व्यक्त केली.छत्रपती संभाजी राजे यांनी लोकसभा निवडणूकीसाठी मैदानात उतरलेल्या प्रीतम मुंडेची भेट घेऊन त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, माझा माझ्या दोन्ही बहिणींना पाठिंबा असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. प्रितम मुंडेंना शुभेच्छा देण्यासाठी ते परळीत आले…
Read More...

मुख्यमंत्री सर, तुम्ही पण आपलं तोंड खराब करून घेऊ नये – पंकजा मुंडे

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्या नंतर, बीडमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनायक मेटे यांना म्हणाले की, जो बीडमध्ये भाजपसोबत तोच राज्यात महायुती सोबत असेल. त्यांना माझं सांगणं आहे भारतीय जनता पार्टी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून जो गोपीनाथ मुंडेंसोबत राहू शकत नाही तो भाजपसोबतही नाही.'  असा थेट इशाराच दिला.यावर सभेत पंकजा मुंडे यांनी देखील विनायक मेटे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. मुंडे म्हणाल्या…
Read More...

बीडमध्ये विनायक मेटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला तर इतरत्र भाजपला पाठिंबा देणार, अशी भुमिका घेतली  आहे. मेटे यांनी आता उघडपणे बीडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार शेतकरीपुत्र बजरंग सोनवणे यांना पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.मुख्यमंत्र्यांनी तीन वेळा ठरवल्यानंतरही माझा मंत्रिमंडळात समावेश होऊ नये, यासाठी पंकजा मुंडे यांनी थेट राजीनामा देऊन घरी बसण्याच्या धमक्या देत विरोध केला. तरीही आपण घटक पक्ष म्हणून काही उघडपणे बोललो नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी लेखी, तोंडी आदेश देऊनही…
Read More...

काँग्रेस म्हणजे ब्रिटिशांची औलाद तर राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसचं पिल्लू – पंकजा मुंडे

नांदेडमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे काल प्रचारसभा घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. काँग्रेस ब्रिटिशांची औलाद असून, राष्ट्रवादी हे काँग्रेसच पिल्लू असल्याची जोरदार टीका पंकजा मुंडे यांनी केली.पंकजा मुंडे म्हणाल्या की, ब्रिटीश भारतात व्यवसाय करण्यासाठी आले होते. व्यवसाय करता-करता त्यांनी 150 वर्ष भारतावर सत्ता गाजवली. त्यानंतर काँग्रेसवाल्यांनी सत्तेमध्ये व्यवसाय केला, त्यामुळे लोकांचा…
Read More...

‘आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले पैसे दिले असते तर बरं झालं असतं’, धनंजय…

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामधील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. तोडपाणी करणारे मुंडे साहेबांचे वारस होऊ शकत नाही, अशी टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली होती. या टीकेला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडें यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वर्ध्यातील प्रचारसभेत ते बोलत होते.धनंजय मुंडे म्हणाले की, शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की खाल्लेले पैसे दिले तर बरं झालं असतं. मुंडे साहेबांचा वारस मी कधीच समजलं नाही. ते पंकजाताईनेच सांभाळावे. त्याचा…
Read More...