InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

pune

माढा, पुणे, नागपूर या प्रतिष्ठित लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाला होणार उशीर

लोकसभा निवडणुकीचे मतमोजणीला सुरुवात झाली असून, प्रत्येकाला आपल्या मतदार संघाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. राज्यातील माढा, पुणे, नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकाल उशिराने हाती येणार आहेत. सर्वाधिक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने या लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक निकाल येण्यास विलंब होणार आहे. दुसरीकडे  मात्र गडचिरोली-चिमूर दिंडोरी, सातारा, लातूर, नंदुरबार, अकोला या मतदारसंघांतील निवडणूक निकाल उमेदवारांची संख्या कमी असल्याने सर्वप्रथम येथील निकाल हाती येतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या…
Read More...

पुण्यात रेल्वे अपघात घडवण्याचा कट? आतापर्यंत 8-10 वेळा अपघात घडवण्याचा प्रयत्न

रेल्वेला अपघात करण्याचा धक्कादायक कट सध्या पुण्यात शिजत असल्याची माहिती समोर येत आहे.  मागील 3 ते 4 महिन्यामध्ये किमान 8 ते 10 वेळेला असे प्रकार समोर आले. पण, लोको पायलट आणि रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपघाताचे कट उधळले गेले आहेत. याबाबत रेल्वे पोलिसांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. पुणे पोलिस देखील आता अधिक सतर्क झाले आहेत. मागील काही दिवसांमध्ये रेल्वे रूळांवर लोखंडी तुकडे ठेवून मोठा अपघात घडवण्याचे प्रयत्न झाले. पुणे रेल्वे पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. एप्रिलमध्ये…
Read More...

पुण्यात 12 अल्पवयीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून 6 महिन्यांपासून विनयभंग

पुण्यात 12 अल्पवयीन विद्यार्थिनींचा मागील 6 महिन्यांपासून शिक्षक विनयभंग करत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मधल्या सुट्टीत शिक्षक विद्यार्थिनींना बोलवायचा आणि त्यांचा विनयभंग करायचा. विक्रम शंकर पोतदार असं या शिक्षकाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 8 मे रोजी हा सारा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर 15 मे रोजी शिक्षकाला अटक करण्यात आली. विक्रम शंकर पोतदार या शिक्षकाविरोधात विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेली तालुक्यातील जिल्हा…
Read More...

लग्न ठरत नसल्याने पुण्यातील तरूणाचे थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र

लग्नास वारंवार नकार मिळत असल्याने पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणाने  थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले आहे. पत्रामध्ये मुलाने इच्छामरणाची मागणी केली आहे. पत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पत्राची दखल घेत पुणे आयुक्तांना याबाबत कळविले. यानंतर स्थानिक दत्तवाडी पोलिसांनी तरूणाशी संपर्क करत त्याचे मन वळवले. मुलाचे पत्र -  मी माझ्या नाकर्तेपणामुळे आनंदाने इच्छा मरणाची मागणी करत आहे. मी आनंदाने मृत्यूला सामोरे जाण्यास तयार आहे. मी 37 वर्षाचा अविवाहित तरुण आहे. मी नोकरी…
Read More...

युतीचे दोन उमेदवार दिल्लीत गेल्यास ‘हे’ होऊ शकतात पुण्याचे पालकमंत्री?

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच पुण्याचा पालकमंत्री कोण? अशी चर्चा पुणे शहरात जोर धरु लागील आहे.  गिरीश बापट विजयी होऊन दिल्लीला गेल्यास त्यांच्या जागी आमदार लक्ष्मण जगताप किंवा बाळा भेगडे यापैकी एकाला संधी दिली जाण्याची शक्‍यता अधिक आहे. मात्र, या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार हे मावळमधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या निकालावरच अवलंबून असून या विषयाची चर्चा पिंपरी-चिंचवडसह मावळमध्ये रंगली आहे. पुण्याचे पालकमंत्री म्हणून सध्या गिरीश बापट हे कार्यरत आहेत. बापट यांना पुणे लोकसभा…
Read More...

‘पुण्यात जूनच्या अखेरपर्यंत तरी पाणी कपात नाही’

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा खालावला असला तरी जून अखेरपर्यंत कपात करण्यात येणार नसल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आढावा बैठकी नंतर जाहीर केले. मात्र प्रत्येक दहा दिवसांनी पाण्याचा आढावा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत 20 टक्के साठा शिल्लक असून हे पाणी जुलै 15 पर्यंत पुरेल याचे नियोजन करण्यात आले आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री गिरिश बापट यांनी आज तातडीची बैठक बोलाविली होती.  या…
Read More...

पुणेकरांना पुढील १०० वर्षे सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न पडणार नाही, अशी मेट्रो उभारण्यात येत आहे…

पुणेकरांना पुढील १०० वर्षे सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न पडणार नाही, अशी मेट्रो उभारण्यात येत आहे. पुण्यात मेट्रो अंडरग्राउंड करायची की ओव्हरहेड याच्यावरच कॉंग्रेस सरकारने आठ ते दहा वर्ष घालवली, आमचा निर्णय झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन करत मेट्रोचे काम सुरु झाले, शहरात तीन मार्गाची उभारणी सरकारकडून केली जात आहे. असे पुणे लोकसभेचे भाजप उमेदवार गिरीश बापट म्हणाले आहेत. विरोधकांनी दहा वर्षे मेट्रोचा एक खड्डा देखील खोदला नाही. त्यामुळे ज्यांना पुण्यात मेट्रो आणता आली नाही,…
Read More...

पुण्यात मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीसाठी काल राज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी 14 मतदारसंघात मतदान पार पडले. महाराष्ट्र सरासरी 61.83 टक्के मतदान झाले. मात्र पुणेकरांनी महाराष्ट्रात सर्वाधिक कमी मतदान केले. पुण्यात सर्वाधिक कमी 43.63 टक्के मतदान झाले. असे असले तरीही, पुण्यातील मराठी कलाकारांनी मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. अभिनेत्री गायत्री दातार आणि अभिनेता सुबोध भावे यांनी मतदानाचा हक्क बजावला.फर्जंद चित्रपटाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, लेखक व गायक सलील कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष…
Read More...

महाराष्ट्रात सरासरी 61.83 टक्के मतदान, पुण्यात सर्वात कमी मतदान

2019 च्या लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात राज्यात 14 मतदारसंघात काल मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात राज्यात सरासरी 57.01 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.तिसऱ्या टप्प्यात 1 कोटी 59 लाख 45 हजार 795 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  पुण्यात सर्वाधिक कमी  43.63 टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात मतदानाची सर्वाधिक टक्केवारी कोल्हापुरात असून तिथे 65.70 टक्के मतदान झालं आहे. त्यापाठोपाठ हातकणंगले मतदारसंघात 64.79 टक्के मतदान झालं आहे. औरंगाबादमध्ये 58.52 टक्के, बारामतीत 55.84 टक्के,…
Read More...

पुणे जिल्ह्यातील चार ही मतदार संघात भाजपच विजयी होणार; गिरीष बापट यांनी व्यक्त केला विश्वास

पुण्याचे महायुतीचे उमेदवार गिरीष बापट यांनी सकाळी सहकुटूंब मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले. घटनेच्या चौकटीत राहून तरुणांनी मतदान करावे, परिवर्तन घडवण्याची ताकद मतदानात असते असे सांगत मतदानाबाबत सर्वांनी गंभीर असावे असे त्यांनी सांगितले. मतदान करणे हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे. काही अपवाद वगळता सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरळीत चालू आहे असे देखील बापट म्हणाले. निवडणुकीदरम्यान मी कोणावर ही टीका केलेली नाही आणि माझ्यावर…
Read More...