InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Shivsena

शिवसेनेकडून मंत्रीपदासाठी ‘यांना’ मिळू शकते संधी

लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजप युतीला मोठे यश मिळाले. भाजपचा 23 जागांवर तर शिवसेनेचा 18 जागांवर विजय झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 30 मेला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याच बरोबर एनडीएच्या मंत्र्यांची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपप्रणित एनडीएच्या खासदारांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.उद्धव ठाकरे या बैठकीदरम्यान पाच मंत्रीपदं मागणार असल्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून मंत्रीपदासाठी राज्यसभा खासदार अनिल देसाई, कोल्हापूरचे…
Read More...

आत्मचिंतनासाठी आता हिमालयात जावं, शिवसेनेचा विरोधकांना सल्ला

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि विरोधी पक्षांना मोठा पराभव स्विकारावा लागला. राज्यात देखील भाजप-सेना युतीचा 41 जागांवर विजय झाला तर आघाडीला केवळ 5 जागांवर विजय मिळाला. विरोधकांच्या या पराभवानंतर शिवसेनेने विरोधकांना आत्मचिंतनासाठी हिमालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसासाठी केदारनाथ येथे गेले तेव्हा त्यांची खिल्ली विरोधकांनी उडवली आता विरोधकांना अंगावर राख फासून हिमालयात जाण्याची वेळ आली आहे असाही खोचक टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून  लगावण्यात आला…
Read More...

नाशिकमधील छगन भुजबळ यांचे वर्चस्व धोक्यात?

दिंडोरीमध्ये भारती पवार आणि  नाशिकमध्ये हेमंत गोडसे या दोन उमेदवारांनी नाशिकमध्ये युतीने विजयाचा झेंडा रोवला. नाशिक जिल्हा आणि शहर कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इथे भुजबळ कुटुंबीयांचं निर्विवाद वर्चस्व होतं. यामुळे राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या नाशिकमधून राष्ट्रवादी भुईसपाट झाल्याने भुजबळ यांना हा धक्का मानला जातोय.दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातले नांदगाव आणि येवला हे दोन विधानसभा मतदारसंघ भुजबळांचे हक्काचे म्हणून ओळखले जातात. या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपच्या…
Read More...

पार्थ पवार यांच्या पराभवानंतर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. असाच धक्कादायक निकाल मावळ लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळाला. पार्थ यांच्या रूपाने पवार कुटुंबाला गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या पराभवानंतर आता अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.'जनतेनं दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं मी अभिनंदन करतो. यावेळी लोकांनी पुन्हा एकदा नरेंद्र…
Read More...

‘आपला पराभव होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं’

राज्यात शिवसेना-भाजप युतीला मोठे यश मिळाले आहे.  राज्यातील सर्वात धक्कादायक अशी निकालाची नोंद ही हातकणंगले मतदारसंघात झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नवखा उमेदवार असलेल्या शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा दणदणीत पराभव केला आहे. एक लाखाच्या मताधिक्याने धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव करत विजय मिळवला.आपल्या पराभवाविषयी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आपला पराभव होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.लोकांना माझ्यापेक्षा चांगला खसादार हवा असं…
Read More...

हेमंत गोडसेंनी 2 लाखांहून अधिक मतांनी पुन्हा विजयी होत रचला इतिहास; समीर भुजबळ पराभूत

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशिक लोकसभा मतदारसंघातून दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाला आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा पराभव केला आहे. नाशिककर एकदा निवडून दिलेला लोकप्रतिनिधी दुसऱ्यांदा निवडून देत नाहीत, असा इतिहास आहे. मात्र यंदा हेमंत गोडसेंनी नवा इतिहास रचला आहे.हेमंत गोडसेंनी या निवडणुकीत आपलाच विक्रम मोडला आहे. मागील निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा 1 लाख 87 हजार मतानी पराभव केला होता. या निवडणुकीत हेमंत गोडसेंना 4लाख 30…
Read More...

शिवसनेचे श्रीरंग बारणे 59 हजार 995 मतांनी आघाडीवर; पार्थ पवार मावळ राखणार?

मावळ हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ मानला जातो. युती झाली असली तरी येथे राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. मात्र शिवसनेचे श्रीरंग बारणे 59 हजार 995 मतांनी आघाडीवर आहेत. शेकापची राष्ट्रवादीला मदत मिळाल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना येथे आणखी फायदा होऊ शकतो. शिवसेनेकडून श्रीरंग बारणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर बहुजन वंचित आघाडीने येथून राजाराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे.10.30 च्या सुमारास पार्थ पवार 4 हजार मतांनी पिछाडीवर. अजित पवार, पार्थ पवार पुण्यातील घरी.…
Read More...

पुतणे संदीप क्षीरसागर यांचा काका जयदत्त क्षीरसागर यांना टोमणा; म्हणाले…

पक्षाने तुम्हाला काय कमी केले होते. कुणी कुणाला चटके दिले हे सर्वांना माहिती आहे. तुम्हीच आत्मचिंतन करा, असा टोला पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना लगावला आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेत प्रवेश करत आहेत त्या पार्श्वभूमीवर संदीप एबीपी माझाशी बोलत होते.आमच्या विचारांमध्ये जो काही वाद होता, तो मान्य आहे. मी जेवढे काही पक्षााचे कार्यक्रम घेतले, त्या कार्यक्रमांध्ये त्यांना निमंत्रित केलं होतं. खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे माझी जिल्हा…
Read More...

राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेत एंट्री; राष्ट्रवादीला धक्का

गेली तीन वर्षे पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बुधवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाराज होते. तसेच, पक्षात आपली घुसमट होत होती, असे सांगत त्यांनी टीकाही केली होती.बीडमधील एका कार्यक्रमात जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. असे असेल तरी…
Read More...

येत्या विधानसभेला भाजप-शिवसेना युती होणार?

येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार की नाही या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश भाजपच्या बैठकीत कोणताही निर्णय दिलेला नाही. भाजपचे प्रदेश पदाधिकारी, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, संघटन मंत्री यांची पक्षांच्या दादरमधील कार्यालयात बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, पक्षाचे प्रमुख मंत्री उपस्थित होते.येत्या विधानसभा निवडणुकीत युती होण्यासंदर्भात मुख्यमंत्री काय बोलतात या बाबत उत्सुकता होती; पण मुख्यमंत्र्यांनी त्यावर कोणतेही भाष्य केले नाही. लोकसभा निवडणुकीच्या…
Read More...