InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आधी लढाऊ विमानं मागे घ्या; पाकिस्तानकडून भारताला आवाहन

बालाकोट हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानने आपलं हवाई क्षेत्र बंद ठेवलं आहे. हे हवाई क्षेत्र खुलं करण्यासाठी आता पाकिस्तानकडून अट ठेवण्यात आली आहे. जोपर्यंत भारतीय वायुसेनेच्या हवाई तळांवरून (फॉरवर्ड बेस) लढाऊ विमानांना हटवले जात नाही तोपर्यंत भारताच्या व्यापारी उड्डाणांसाठी पाकिस्तान आपलं हवाई क्षेत्र खुलं करून देणार नाही. पाकिस्तानचे हवाई उड्डाण खात्याचे सचिव शाहरुख नुसरत यांनी एका संसदीय समितीला ही माहिती दिली.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर २६ फेब्रुवारीपासून पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले. ‘डॉन न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार गुरुवारी नुसरत यांच्या विभागाने भारतीय अधिकाऱ्यांना सूचना दिली की जोपर्यमत भारताच्या हवाई तळांवरून फायटर विमाने मागे हटत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानचं हवाई क्षेत्र भारतासाठी खुलं होणार नाही.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply