‘भावा कतरिनाची काळजी घे’; विकी-रणबीरच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ पुढील महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा आहे. यासोबतच अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. बॉलिवूडच्या या स्टार्सच्या लग्नाची चर्चा असताना विकी कौशल आणि रणबीर कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोवर नेटकरी भन्नाट कमेंट करताना पाहायला मिळत आहे.

एक इन्स्टाग्राम अकाऊंटवर विकी आणि रणबीरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. दोघे एकमेकांशी हसत हसत बोलत असल्याचं फोटोमध्ये दिसून येतंय. विकी आणि रणबीरच्या या फोटोंवर एकापेक्षा एक अशा भन्नाट कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं, ‘दोघेही एकमेकांना लग्नाबद्दल अभिनंदन करत आहेत.’ तर एका चाहत्याने ‘विकी टू रणबीर – भावा कतरिनाची काळजी घे’ असं लिहिलं. अशा अनेक मजेदार कमेंट्स या दोघांच्या फोटोंवर केल्या आहेत.

दरम्यान विकी आणि कतरिना डिसेंबरमध्ये सिक्स सेन्स फोर्ट, बरवारा, राजस्थान येथे लग्न करणार असल्याची माहिती आहे. या लग्नाला बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रेटी उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर याआधी अशा बातम्या येत होत्या की, रणबीर आणि आलिया देखील या वर्षाच्या अखेरीस लग्न करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा