‘100 कोटी घ्या अन् भाजपला विरोध करा’; ‘या’ संताला आप आणि काँग्रेसची ऑफर

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर जमीन घोटाळा मुद्यावरून सध्या देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहेत. यात साधू परमहंस दास यांनी मोठा दावा केला आहे.

“भारतीय जनता पार्टीला विरोध दर्शविण्यासाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी 100 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे,” असा दावा आणि गंभीर आरोप दास यांनी केले आहेत.

“जमीन गैरव्यवहार नसून राजकीय नेत्यांची एक मोठी खेळी आहे. 17 तारखेला सकाळी दोन व्यक्ती आल्या होत्या. यावेळी त्यांनी मला 100 कोटी रुपयांची ऑफर देत भाजपचा विरोध करण्यास सांगितलं. तसेच आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने शंकराचार्य स्वरूपानंद यांना 50 कोटी रुपये दिले आहेत,” असा दावा परमहंस दास यांनी केला आहे.

“उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेस किंवा आम आदमी पार्टी विजयी झाल्यास मला मुख्यमंत्री बनवण्यात येईल. अशीही ऑफर मला देण्यात आली होती. मी एक संत आहे आणि राष्ट्रहीत माझ्यासाठी सर्वोतोपरी आहे,” असं दास यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा