‘लस घ्या आणि बाहुबली व्हा’; नरेंद्र मोदींचं जनतेला आवाहन

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (ता.१९) प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी संसदेबाहेरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सर्वांनी करोना नियमांचं पालन करावं, असं आवाहन नेत्यांना केले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना लस घेण्याचं आव्हान केलं. ते म्हणाले की, ‘लस दंडावर घेतली जाते. त्यामुळेच कोरोना विरोधातील लढ्यात लस घेतलेला बाहुबली बनतो. 40 कोटींपेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. कोरोनाच्या लढ्यात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कोरोनाविरोधात बाहुबली होऊन लढा देऊयात.’

दरम्यान, राजधानी दिल्लीमध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे संसदेत पोहचण्यासाठी सर्वच नेत्यांना छत्रीचा आधार घ्यावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्व:त छत्री घेऊन संसदेत पोहचले होते. यावेळी मोदी म्हणाले की, ‘आशा आहे की सर्वांनी एकतरी कोरोना लसीचा डोस घेतला असेल. पण तरिही सर्वांनी कोरोना नियमांचं पालन करावं. संसदेत उपस्थित असणाऱ्या सर्वांना विनंती करतो की करोना नियमांचं पालन करावं.’

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा