InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

“दुसरा कोणी मोदी तयार होऊ नये म्हणून काळजी घेत आहे”

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत  शरद पवारांनी मोदी सरकार जोरदार टीका केली. ‘मी माझं बोट आता कोणाला धरु देत नाही. दुसरा कोणी मोदी तयार होऊ नये म्हणून मी ही काळजी घेत आहे.’ असं वक्तव्य शरद पवारांनी यावेळी केले.

‘मी माझं बोट आता कोणाला धरु देत नाही. दुसरा कोणी मोदी तयार होऊ नये याची काळजी मी घेत आहे. वर्ध्यातील सभेत बोलताना त्यांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टीका केली. पवार कुटुंबात भांडणं होतात असं ते म्हणाले. राजकारणात वैयक्तिक टीका करायची नाही असा नियम आहे. दिल्लीत मला भेटतील तेव्हा मोदींना मी यासंबंधी विचारणार आहे’. असे शरद पवार यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply