तालिबानचं बलाढ्य अमेरिकेला दिलं आव्हान; ३१ ऑगस्टपर्यंत तारखेपर्यंत सैन्य मागे घ्या नाहीतर…
काबुल : अमेरिकेने सैन्य माघारीची घोषणा केल्यानंतर तालिबानने आक्रमक भूमिका घेत अफगाणिस्तानमधील अनेक भागांचा ताबा घेण्यास सुरुवात केली होती. यानंतर संपूर्ण अफगाणिस्तानवर आता तालिबानींनी आपली सत्ता प्रस्थापित केली. तालिबानने काबूल आणि कंधार ही दोन महत्त्वाची शहरं जरी तालिबानच्या ताब्यात आहेत. तर काही भागात अमेरिकन सैन्य तळ ठोकून बसलं आहे.
यानंतर आता अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानीनीं पहिल्यांदाच अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अमेरिकन फौजांनी अफगाणिस्तान सोडावं, ही डेडलाईन चुकली तर मग परिणाम भोगायला तयार रहा असा इशारा तालिबानने अमेरिकेला दिला आहे. तालिबानने काबूलवर सत्ता मिळवल्यानंतर G 7 गटातील देशांचे नेते मंगळवारी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भेटणार होते.
मात्र आता या पार्श्वभूमीवर तालिबानने अमेरिकेला दिलेली धमकी महत्वपूर्ण मानली जात आहे. अजूनही अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील काही भागावर अमेरिकन सैन्याने ताबा मिळवला आहे. तर काबूल विमानतळावर देखील सध्या अमेरिकन सैन्याचा ताबा आहे. त्यामुळे भारतीय तसेच इतर देशातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यास मदत होत आहे.
दरम्यान, सर्व नागरिकांना बाहेर काढल्यानंतर अमेरिकन सैन्य तालिबानवर पुन्हा हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालिबानने थेट अमेरिकेलाच इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- प्रत्येकवेळी संयमाची सबुरीची भाषा हिंदू बांधवांनाच का सांगायची?,दहीहंडीला परवानगी नाकारल्याने राम कदम आक्रमक
- अजित पवारांच्या बोलण्याला काडीचीही किंमत देत नाही : गोपीचंद पडळकर
- ‘राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी दिली नाही तर…’; आशिष शेलारांचा सरकारला इशारा
- महाविकास आघाडी म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे : देवेंद्र फडणवीस
- अफगाणिस्तान सोडून पळालेल्या अश्रफ घनींना तालिबानकडून खास ऑफर, घनी स्वीकारणार?