‘भारतात टिक टॉक बंद करण्यात आले आणि मी बेरोजगार झालो’ : रितेश देशमुख

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने गेल्या वर्षी लॉकडाउन दरम्यान, टिक टॉक या अॅपवर पदार्पण केले होते. मात्र, काही काळानंतर टिक टॉक भारतात बंद करण्यात आलं आणि त्यावर रितेशने एक मजेशीर वक्तव्य केलं होतं.

एका मुलाखतीत याबद्दल बोलताना रितेश म्हणाला, “लॉकडाउन दरम्यान, सगळेच कठीण प्रसंगातून गेले. अशात आम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा विचार केला. म्हणून आम्ही टिक टॉक व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. परंतु, भारतात टिक टॉक बंद करण्यात आलं आणि असं वाटलं मी बेरोजगार झालो. असं वाटायचं की देवा आता काय करू मी. जे काम मी करायचो ते तर गेलं.
काही दिवसांनंतर इन्स्टाग्रामवर रिल्स आले. मी म्हणालो चल रिल्स तयार करू.” असं मजेशीर वक्तव्य रितेशने केले होते.

दरम्यान, रितेश सगळ्यात शेवटी ‘बाघी ३’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात तो टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत दिसला होता.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा