Tanaji Sawant | “आदित्य ठाकरेंच्या मेंदूवर परिणाम, मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा”; तानाजी सावंतांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

Tanaji Sawant | सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपल्या जन्मगावी माढ्याच्या वाकावमध्ये गुंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धार लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी जोरदार भाषण केलं. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना तानाजी सावंत यांनी शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

“आदित्य ठाकरेंच्या मेंदूवर परिणाम, मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा”

“आदित्य ठाकरे यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे. राज्याचा आरोग्य मंत्री म्हणून त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना देईन. माझ्या विभागाकडे राज्यात चार मेंटल हॉस्पिटल आहेत. चार मेंटल हॉस्पिटल पैकी एका हॉस्पिटलमध्ये आदित्य ठाकरेंसाठी बेड आरक्षित ठेवणार”, असं म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

“सरकार निर्मितीचा फाऊंडर तानाजी सावंत” (I am the founder of Shinde government)

“महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणणं किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार निर्मितीचा फाऊंडर तानाजी सावंत होता”, असं मोठं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. “ठाकरे सरकारच्या काळात आपल्यावर अन्याय झाला होता. या अन्यायामुळे आपण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जावून नाराजी व्यक्त केली होती. ‘मातोश्री’ची पायरी कधीही चढणार नाही, असा इशारा दिला होता”, अशी माहिती तानाजी सावंत यांनी आज दिली आहे.

“‘मातोश्री’त माझावर अन्याय झाला”

“2019 ला ‘मातोश्री’ समोर जाऊन माझ्यावर अन्याय का केला? असं विचारणारा तानाजी सावंत होता. मला उत्तर नाही मिळाले तर फळं भोगावी लागतील. परत मातोश्रीची पायरी चढणार नाही, असा इशारा मी ठाकरेंसमोर तेव्हाच दिला होतं. एकनाथ शिंदेंनी मला मंत्रिपदाच्या रुपातच मंत्रालयाची पायरी चढवायला लावली”, असंही तानाजी सावंत म्हणाले आहेत.

“अन्यायाच्या विरोधात लढा कसा असतो हे दाखवून देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. आणि ते घडलं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सरकार निर्मितीचा फाऊंडर तानाजी सावंत होता”, असं ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

 

You might also like

Comments are closed.