भ्रष्ट पोलिसांनी नाना पाटेकरांना क्लीन चिट दिली- तनुश्री दत्ता

भ्रष्ट पोलिसांनी नाना पाटेकरांना क्लीन चिट दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे. एवढंच नाही तर सिनेसृष्टीत नाना पाटेकर यांनी माझाच नाही अनेक जणींचा छळ केला आहे असाही आरोप तनुश्रीने केला आहे.

तनुश्रीचे वकील नितीन सातपुते यांनी आम्हाला पोलिसांच्या अहवालाची कोणतीही प्रत दिली नसल्याचं म्हटलं आहे. तसंच या प्रकरणी आम्ही जनहित याचिका दाखल करणार असल्याचंही म्हटलं आहे.

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचा अहवाल ओशिवरा पोलिसांनी कोर्टात सादर केला त्यानंतर तनुश्री दत्ता आणि तिच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Loading...

‘वंचित’ ही दलितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी – रामदास आठवले

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.