Tanushree dutta and Nana Patekar | “मला काही झाले तर नाना पाटेकर,…”; तनुश्री दत्ताची खळबळजनक पोस्ट

महाराष्ट्र देशा डेस्क : 2018 मध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने सोशल मीडियावर MeToo हा हॅशटॅग सुरू करून सर्वांना आश्चर्यचकित केले, ज्यामध्ये तिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तेव्हापासून तनुश्री तिच्या पोस्ट आणि मुलाखतींच्या माध्यमातून बॉलीवूडमधील पुरुषप्रधान संस्कृतीवर नेहमीच भाष्य करत असते. त्यातच आता, आता तनुश्री दत्ताच्या नव्या पोस्टने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. तिने इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तनुश्रीने आरोप केला आहे की अनेक लोक तिला टार्गेट करत आहेत.

इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर करत तनुश्री दत्ताने एक कॅप्शन लिहिले आहे. ज्यामध्ये तिने मीटू, नाना पाटेकर ते सुशांत सिंह राजपूतचा देखील उल्लेख केला आहे. तिने लिहिले की, “मला कधी काही झाले तर #MeToo चे आरोपी नाना पाटेकर, त्यांचे वकील, सहकारी आणि त्यांचे बॉलीवूड माफिया मित्र जबाबदार असतील! बॉलिवूड माफिया कोण आहे? सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ज्यांची नावे वारंवार समोर आली तेच लोकं. (लक्षात घ्या की प्रत्येकाचा फौजदारी वकील एकच आहे).”

याच्या पुढे तनुश्री दत्ताने लिहिले, “त्यांचे चित्रपट पाहू नका. त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाका. माझ्या आणि PR बद्दल खोट्या बातम्या पसरवणार्‍या लोकांचा आणि पत्रकारांचा शोध घ्या. प्रत्येकाच्या मागे लागा. त्यांचे जीवन नर्क बनवा कारण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे! कायदा आणि न्याय व्यवस्थेने मला अपयशी ठरवले असेल पण माझा या महान देशाच्या लोकांवर विश्वास आहे.”

नानांना मिळाली क्लीन चिट
तनुश्री दत्ताने २०१८ मध्ये भारतात #MeToo सुरू केले होते. यादरम्यान तिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तिच्या म्हणण्यानुसार, 2009 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी तनुश्रीच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता. नाना पाटेकर यांच्यावरील या आरोपामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. नानांनी स्वतःवरील सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले होते आणि 2019 मध्ये पोलिसांनी त्यांना क्लीन चिटही दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.