तारासिंह-सकिना पुन्हा झळकणार एकत्र; ‘गदर २’च्या शूटिंगला झाली सुरुवात

मुंबई : बॉलिवूडमधील अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे ‘गदर: एक प्रेम कथा.’ आता जवळपास २० वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणास देखील सुरुवात झाल्याचे समोर आले आहे.

अमिषा पटेलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘गदर २’च्या सेटवरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तारा सिंग व सकीना सैनिकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. त्यांच्यासोबतच चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा देखील दिसत आहेत. त्यांचा सेटवरचा हा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

‘गदर २’ चित्रपटाची कथा ही ‘गदर’ पेक्षा थोडी वेगळी असणार आहे. या चित्रपटात तारा सिंह पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये जाणार आहे. पण तो सकिनासाठी नाही तर त्याच्या मुलासाठी जाणार आहे. त्यामुळे गदर चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये एक वेगळी कथा पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा