Tarak Mehta ka Ulta Chashma | टप्पुनंतर दिग्दर्शकाने ‘या’ कारणामुळे सोडला शो

Tarak Mehta ka Ulta Chashma | मुंबई: तारक मेहता का उल्टा चश्मा (Tarak Mehta ka Ulta Chashma) हा टीव्ही शो गेले अनेक वर्ष चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. संपूर्ण देशात या शोचे चाहते आहे. पण या शो मधील लोकप्रिय कलाकार दिवसेंदिवस सोडताना दिसत आहे. दया म्हणजेच दिशा वकानी आणि तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा यांच्यानंतर राज अनादकट म्हणजेच टप्पुने देखील शो सोडला आहे. टप्पूनंतर या शोचे दिग्दर्शक शो सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. शोचे दिग्दर्शक मालव राजदा यांनी 15 डिसेंबर रोजी शेवटच्या वेळी शो दिग्दर्शित केला होता.

मीडिया रिपोर्टनुसार, तारक मेहता का उल्टा चश्मा या शोचे डायरेक्टर मालव राजदा आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये काही मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांनी हा शो सोडला आहे. प्रोडक्शनने त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधला असून, मालव राजदा यांनी प्रोडक्शनला नकार दिला आहे. मालव राजदा यांनी शो सोडण्याचे कारण देखील सांगितले आहे.

मालव राजदा यांना शो का सोडला? असा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा ते म्हणाले होते,”मी हा शो 14 वर्षापासून करत आहे. या वर्षी हा शो केल्यानंतर मी कंफर्ट झोनमध्ये आलो आहे. त्यामुळे नवीन आव्हानांना स्वीकारण्यासाठी आणि स्वतःला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढण्यासाठी मी हा शो सोडत आहे. या शोची 14 वर्षे माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर वर्ष होती. या शोच्या माध्यमातून मला पैसा आणि प्रसिद्धी तर मिळालीच, पण त्यासोबत या शोमध्ये मला माझी जीवनसाथी प्रिया देखील मिळाली होती.”

दिग्दर्शक मालव राजदा यांच्या आधी अभिनेत्री नेहा मेहता, अभिनेता राज अनादकट, शैलेश लोढा हा शो सोडला आहे. मालव राजदा यांची पत्नी प्रिया देखील या शोचा भाग आहे. पण पती पाठोपाठ ती देखील हा शो सोडण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या