Tata AirBus Project । शिंदे-फडणवीस सरकार गुजरातचे एजंट; नाना पटोले यांची बोचरी टीका

Tata AirBus Project | मुंबई : C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata AirBus Projec) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. या बातमीनंतर महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारला महाराष्ट्रद्रोही संबोधत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी टाटा एअरबस प्रोजेक्टवरून टीका केलीये.

नाना पटोले आज नागपूरमध्ये बोलत होते. केंद्रातलं मोदी सरकार मुंबई, महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत असून, राज्यातलं सरकार एक दिवस मुंबईही गुजरातला देऊन टाकेल, अशा शब्दात पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, ‘महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहेत. गुजरात महाराष्ट्राच्या मागे आहे, याचे शल्य पंतप्रधान मोदींना आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलवण्याचा सपाटा लावला आहे’.

दुर्दैवानं यापूर्वीचे फडणवीस आणि आताचे ईडी या दोन्ही सरकारांनी महाराष्ट्राच्या हित डावलून मोदींच्या गुजरातच्या हिताला जास्त महत्व दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, पालघर येथील प्रस्तावित मरीन अकादमी, मुंबईतील डायमंड बोर्स असे अनेक महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेले, असा आरोप नाना पटोलेंनी केली.

दरम्यान, दुसरीकडे काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. टाटा एअर बस सारखा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून इतर राज्यात जाणे ही फार दुर्दैवी परिस्थिती असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. महाराष्ट्रात होणारे असे मोठे प्रकल्प इतर ठिकाणी जात असल्याने राज्यातील तरुणांची रोजगाराची संधी जात आहे. दुर्दैवाने सरकार पातळीवर प्रयत्न होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.