Tata Group | अभिमानस्पद! टाटाने मिळवले जगातील टॉप 20 कंपन्यांमध्ये स्थान

Tata Group | सर्वांचं माहिती असलेल्या आयटी ( IT) क्षेत्रातील TCS कंपनी, मेटल क्षेत्रातील टाटा स्टील, टाटा मोटर्ससह इंडियन हॉटेल कंपनी या टाटा समूहाचा भाग आहेत. मीठापासून ते आलिशान गाड्या बनवणाऱ्या या समूहाचा व्यवसाय 1868 मध्ये सुरू झाला. तो व्यवसाय आजही प्रगतीपथावर आहे. तर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जगातील टॉप-50 कंपन्यांच्या यादीत टाटा समूहाच्या नावाचा समावेश झाला आहे. यामुळे ही अभिमानस्पद गोष्ट असून टाटा समूहाने (Tata Group) जगातील टॉप 20 कंपन्यांमध्ये स्थान मिळालं आहे.

टाटा समूह 20 व्या क्रमांकावर-

तसचं बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने 2023 मधील सर्वाधिक नाविन्यपूर्ण कंपन्यांची यादी जाहीर केली असून यामध्ये यामध्ये टाटा समूह (Tata Group) 20 व्या क्रमांकावर आहे. तर ही यादी प्रत्येकवर्षी जाहीर केली जाते त्यामध्ये जगतील अनेक कंपनीचा समावेश असतो तर त्यामध्ये कंपन्यांची कामगिरी, त्यांची क्षमता आणि वेगळेपण काय आहे. हे घटक बघितले जातात. त्यानंतर ही यादी जाहीर केली जाते.

Tata Group at 20th position

दरम्यान, पहिल्या तीन क्रमांकावर आयफोन बनवणारी अमेरिकन कंपनी Apple ही पहिल्या क्रमांकावर आहे. तर एलोन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला ( Tasla) ही दुसऱ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकावर अॅमेझॉन ही कंपनी आहे. तर मीडिया रिपोर्टनुसार 2022 मध्ये टेस्ला ही कंपनी तिसऱ्या क्रमांकावर होती. परंतु या वर्षी मात्र टेस्लाने दुसऱ्या क्रमांक पटकवला आहे. तर टाटाने ( Tata Group) आपल्या व्यवसायात चांगली कामगिरी करत हे स्थान पटकावलेलं पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3ot1x6Y