Tata New Vehicles Launch | टाटा मोटर्सने केले तीन नवीन पिक-अप वाहने लाँच

टाटा मोटर्स या ऑटोमोबाईल कंपनीने देशात मोठे स्थान निर्माण केले आहे. या कंपनीने आता ग्राहकांसाठी तीन नवीन वाहने लाँच केली आहे. हे वाहनांची रचना लोकांचा गरजेनुसार केल्याचे कंपनीने सांगितले आहे. यामध्ये योद्धा 2.0 (Yodha 2.0), इंट्रा वी 20 बाय फ्युल (Intra V20 bi-fuel) आणि इंट्रा वी 50 (Intra V50) या तीन नवीन वाहनांचा समावेश आहे. या वाहनांना मार्केटमध्ये खूप मागणी असल्याने कंपनीने या वाहनांच्या 750 युनिट्सची डिलिव्हरी देखील केली आहे.

योद्धा 2.0 (Yodha 2.0)

टाटा योद्धा 2.0 पिकअप ट्रकची लोडिंग क्षमता 2,000 किलो आहे. टाटा योद्धा 2.0 पिकअपमध्ये 2.2 लीटरचे डिझेल इंजिन आहे, जे 250 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. या वाहनाची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे.

टाटा इंट्रा V50

टाटा इंट्रा V50 ची लोडिंग क्षमता 1.5 टन आहे. यामध्ये 2.5L डिझेल इंजिन वापरण्यात आलेले आहे, जे जास्तीत जास्त 220 Nm टॉर्क निर्माण करू शकते. या वाहनाची लांब लोड बॉडी 2,960 मिमी आहे, ज्यामुळे याची लोडिंग क्षमता आणखी वाढते. या वाहनाची एक्स-शोरूम किंमत 8.67 लाख रुपये आहे.

टाटा इंट्रा वी20 बाय-फ्यूल

टाटा इंट्राला बाय-फ्यूल टेक्नॉलजी इंजिनसह उपलब्ध आहे. यात 1.2 लीटर चे इंजिन आहे, जे 160 Nm टॉर्क निर्माण करते. याची लोडिंग क्षमता 1,000 किलोपर्यंत आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.