Tata Upcoming Car | ‘या’ दमदार फीचर्ससह लाँच होणार टाटा हॅरिअर स्पेशल व्हेरीयंट
Tata Upcoming Car | टीम महाराष्ट्र देशा: देशातील आघाडीची कार (Car) उत्पादक कंपनी टाटा (Tata) मोटर्स नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवीन कार लाँच करत असते. त्यामुळे टाटा मोटर्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात टाटा मोटर्स लवकरच त्यांच्या टाटा हॅरिअरचे नवीन व्हेरियंट लाँच करू शकते. कंपनी विशेष आकर्षक फीचर्ससह हे व्हेरियंट बाजारात सादर करू शकते.
फीचर्स
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन टाटा हॅरियरमध्ये ADAS तंत्रज्ञान उपलब्ध असू शकते. या नवीन एसयूव्हीमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अपडेटेड इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि पार्किंग सहाय्यासाठी 360-डिग्री कॅमेरा इत्यादी वैशिष्ट्य असू शकतात.
डिजाईन
या गाडीच्या डिजाईनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये लांब बोनेटसह नवीन रोम ब्लॅक ग्रिल, रुंद एअर डॅम आणि प्रोजेक्टर हेडलॅम्पसह नवीन एलईडी डीआरएल, कारच्या बाजूला ब्लॅक बी-पिलर, फ्लेर्ड व्हील आर्च, इंडिकेटर-माउंटेड उपलब्ध असू शकते.
इंजिन
टाटा हेरियर स्पेशल व्हेरीयंट बाजारामध्ये दोन इंजिन पर्यायमध्ये लाँच केल्या जाऊ शकते. यामध्ये पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन यांचा समावेश असेल. या कारला 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गेअर बॉक्स पर्याय दिले जाऊ शकतात. त्याचबरोबर ही नवीन एसयूव्ही 17kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
किंमत
कंपनीकडून अद्याप या कारच्या किमतीबाबत कोणतेही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण अंदाजानुसार, या कारची किंमत जवळपास चौदा लाख रुपयांपर्यंत असू शकते. ही कार भारतीय बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महिंद्रा थार, महिंद्रा एसयूव्ही 700, एमजी हेक्टर आणि टाटा नेक्सन ईव्ही कार सोबत स्पर्धा करेल.
महत्वाच्या बातम्या
- Gandhi Godse Ek Yudh | ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज, पाहा Video
- PM Kisan Yojana | नवीन वर्षातील ‘या’ महिन्यात मिळेल शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 13 वा हप्ता
- Hair Care Tips | हिवाळ्यामध्ये केसांना कोमट तेल लावल्याने मिळतील ‘हे’ फायदे
- IND vs SL | बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिकेसाठी ‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचे नेतृत्व
- Winter Session 2022 | “दरमहा २० हजार निवृत्ती वेतन…” ; सीमा भागातील मराठी नागरिकांसाठी घेतलेल्या निर्णयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.