‘रेल्वे स्टेशनवर प्लास्टिक कपऐवजी कुल्लडमधूनच चहा’

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे स्टेशनवरही कुल्लडमधून चहा उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे मातीकाम करणाऱ्या कुंभारांना रोजगार मिळेल, असंही गडकरींनी नमूद केलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सध्या बहुतांशी ठिकाणी चहा देण्यासाठी प्लॅस्टिक किंवा कागदाच्या कपांचा उपयोग केला जातो. त्यामुळे होणारं प्रदुषण आणि इतर बाबी लक्षात घेऊन नितीन गडकरी यांनी कुल्लड चहाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे. यासाठी गडकरींनी रेल्वे मंत्री आणि सर्व राज्यांच्या वाहतूक सचिवांना प्लास्टिक आणि कागदी कपाऐवजी मातीचे भांडे (कुल्लड) देण्याची मागणी केली आहे. यातून कुंभार काम करणाऱ्यांना रोजगार मिळेल असंही गडकरींनी नमूद केलं.

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.