Tea Tips | गुलाबी थंडीमध्ये निरोगी राहण्यासाठी ‘या’ चहा ने करा दिवसाची सुरुवात

टीम महाराष्ट्र देशा: बहुतांश लोकांना आपल्या दिवसाची सुरुवात चहा Tea ने करायला आवडते. कारण चहा आपल्या शरीराला ऊर्जा देतो. त्यामुळे बहुतांश लोक उठल्या उठल्या चहा पिण्याला प्राधान्य देतात. यामध्ये प्रामुख्याने लोकांना दुधाचा चहा प्यायला आवडतो. पण या गुलाबी थंडीमध्ये तुम्ही दूधाव्यतिरिक्त अन्य चहा देखील पिऊ शकता. दिवसाची सुरुवात लवंग आणि आलं किंवा ग्रीन टी Green Tea ने केल्यास गुलाबी थंडीमध्ये तुम्ही निरोगी राहू शकतात.

सप्टेंबर ते फेब्रुवारी या महिन्यादरम्यान जरी आपल्याला गुलाबी थंडी अनुभवायला मिळत असली तरी, याच गुलाबी थंडीच्या दरम्यान आपल्याला सर्दी, खोकला, व्हायरल इत्यादी आजारांना सामोरे जावे लागते. कारण जसा जसा थंडीमध्ये गारवा वाढवायला लागतो तशा आपल्याला सर्दीच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे या गुलाबी थंडीमध्ये आपल्या दिवसाची सुरुवात लवंग आणि आल्याचा चहा पिऊन करावी. त्याचबरोबर तुम्ही हिवाळ्यात आपल्या दिवसाची सुरुवात ग्रीन टी ने देखील करू शकता.

गुलाबी थंडीमध्ये आल्याचा आणि लवंगाचा चहा किंवा ग्रीन टी Green Tea का घ्यावा ?

  • ग्रीन टी आणि लवंग आल्यापासून तयार केलेल्या चहा मध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म उपलब्ध असतात. त्याचबरोबर या चहा मध्ये अँटी-इम्प्लोमेट्री गुणधर्म देखील आढळतात. हे गुणधर्म बदलत्या वातावरणामुळे होणारे समस्यापासून आपले शरीर निरोगी ठेवते.
  • या दोन्ही चहा मध्ये आढळणाऱ्या अँटीबॅक्टरियल गुणधर्माचा फायदा असे आहे की बदलत्या ऋतूमध्ये बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात ॲक्टीव्ह असतात. त्यामुळे सर्दी, खोकला, व्हायरल यासारखे संसर्गजन्य रोग पसरतात. त्यामुळे लवंग आणि आल्याचा चहा सोबत ग्रीन टी देखील तुम्हाला या आजारापासून वाचवू शकतो.
  • या गुलाबी थंडीमध्ये तुम्हाला दुधापासून बनवलेला चहा आवडत असेल आणि तो सोडायची इच्छा नसेल तर तुम्ही त्या चहा मध्ये देखील लवंग आणि आल्याचा समावेश करू शकता. यामुळे चहाची चव वाढून आजारी दूर राहतील.
  • जर तुम्हाला काळा चहा प्यायला आवडत असेल तर, त्या चहा मध्ये देखील तुम्ही लवंग आणि आल्याचा समावेश करू शकता. या चहाची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये लवंग आणि आल्या सोबतच लिंबाच्या रसाचे दोन तीन थेंब देखील टाकू शकता.
  • या गुलाबी थंडीमध्ये तुम्हाला जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ग्रीन टी चे सेवन केले पाहिजे. ग्रीन टी तुमच्या शरीरातील मेटाबोलिजम नियंत्रण ठेवते. मी वजन कमी करण्यास मदत करते.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.