Team India | रोहित-विराटसह टीम इंडियातील ‘या’ वरिष्ठ खेळाडूंचा टी-20 प्रवास थांबणार?

Team India | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये 3 जानेवारीपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20 संघाचे कर्णधार पद सांभाळणार आहे. या मालिकेमध्ये निवड समितीने भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार भारतीय संघातील 6 वरिष्ठ खेळाडू टी-20 कारकीर्द संपवण्याचा विचार करत आहे. यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar), मोहम्मद शमी (Mohommad Shami), दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) आणि आर आश्विन (R Ashwin) या नावांचा समावेश आहे.

इनसाइटस्पोर्ट्सला बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे की, “आम्ही आता 2024 टी-20 विश्वचषकासाठी योजना आखत आहे. भारतीय टी-20 संघातील अनेक खेळाडू 35-36 वर्षांचे आहेत. त्यामुळे ते आमच्या दीर्घकालीन योजनेमध्ये बसत नाही. आम्हाला आत्तापासूनच चांगली टीम तयार करायची आहे. त्यामुळे आम्ही काही कठोर निर्णय घेणार आहोत.”

ज्या खेळाडूंचा टी-20 प्रवास संपणार आहे, त्यामध्ये अश्विन, मोहम्मद शमी, दिनेश आणि कार्तिक भुवनेश्वर कुमार या नावांचा समावेश आहे. त्याचबरोबर या यादीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची देखील नाव आहे. संघ आता भविष्याच्या दृष्टीने विचार करत असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय संघामध्ये अनेक बदल बघायला मिळाले आहे. यामध्ये बीसीसीआयने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यावरून असे लक्षात येत आहे की निवड समिती टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ सुसज्ज करत आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.