Team India | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपाठोपाठ ‘हा’ दिग्गज खेळाडू वर्ल्डकप मधूनही बाहेर
Team India | टीम महाराष्ट्र देशा: या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची जोरात तयारी सुरू आहे. एकदिवसीय विश्वचषकाआधी भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना खेळायचा आहे. हे दोन मोठे सामने खेळायच्या आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू या दोन्ही स्पर्धेतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे.
‘हा’ दिग्गज खेळाडू वर्ल्डकप मधूनही बाहेर (‘This’ legendary player is also out of the World Cup)
टीम इंडियाचा (Team India) स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक दोन्ही स्पर्धेतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. कार अपघातानंतर ऋषभ पंत या दोन्ही टूर्नामेंटमधून बाहेर पडला आहे. ऋषभ पंतला पुनरागमनासाठी थोडा वेळ लागणार असून जानेवारीपर्यंत तो पुन्हा मैदानात उतरू शकतो.
30 डिसेंबर रोजी हम्मादपुर झाल जवळ रुरकीच्या नरसन सीमेवर वळण घेत असताना त्याच्या कारचा अपघात झाला होता. त्यानंतर त्याच्या गाडीने आग लागली होती. त्याला या अपघातामध्ये गंभीर जखमा झाल्या होत्या. या अपघातामध्ये त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे. त्याच्या दुःखपतीत हळूहळू सुधारणा होत आहे.
ऋषभ पंतने डिसेंबर महिन्यात बांगलादेशमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व (Team India) केले होते. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमी पुनर्वसनासाठी गेल्यावर त्याची परतीची नेमकी वेळ समजेल. पंत फलंदाज म्हणून लवकर पुनरागमन करू शकतो. मात्र, यष्टीरक्षक म्हणून तयार होण्यास त्याला अधिक वेळ लागू शकतो.
महत्वाच्या बातम्या
- Barsu Refinery Project | कोकण रिफायनरी प्रकल्पाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य ; म्हणाले…
- Job Opportunity | फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Weather Update | पुढचे चार दिवस महत्त्वाचे! राज्यात अवकाळी पाऊस घालणार धुमाकूळ
- Refinery Project | कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध का?; जाणून घ्या काय आहे प्रकरण
- Ajit pawar | “दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या गौतमी पाटील बाईला बोलवा” : अजित पवार
Comments are closed.