Team India | वर्ल्ड कपसाठी BCCI ने घेतले ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय

Team India | मुंबई: नवीन वर्ष सुरू होताच भारतीय संघ (Team India) पुढील सामन्यांसाठी सुसज्ज होत आहे. भारतीय संघाने 2022 मध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गमावली. त्याचबरोबर गेल्या वर्षांमध्ये टीम इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीमध्ये बीसीसीआय (BCCI) ने वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये बीसीसीआयने वर्ल्ड कप जिंकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.

मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भारतीय संघाच्या 2022 मधील कामगिरीवर चर्चा झाली. त्याचबरोबर नवीन वर्षांमधील सामने, वर्कलोड मॅनेजमेंट, आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी नियोजन करण्यात आले आहे.

या बैठकीमध्ये बीसीसीआयने तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे, खेळत असलेल्या खेळाडूंना देशांतर्गत मालिकांमध्ये नियमित खेळावे लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे यो-यो चाचणी आणि डेक्सा निवड प्रक्रियेचा भाग असतील. ही निवड प्रक्रिया वरिष्ठ संघाच्या पूलमध्ये असलेल्या खेळाडूंना लागू केली जाईल. तिसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे, एक दिवसीय विश्वचषक आणि इतर सामने लक्षात घेऊन, BCCI खेळाडूंच्या वर्कलोड व्यवस्थापन करणार आहे.

टी-20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर भारतीय संघामध्ये बदल होण्याची शक्यता दिसत होती. दरम्यान, टी-20 संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. तर, एकदिवसीय आणि कसोटी सामन्याची जबाबदारी रोहित शर्माकडे देण्यात आली आहे.

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये 3 जानेवारीपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20 संघाचे कर्णधार पद सांभाळणार आहे.

महत्वाच्या बातम्या