Team India | BCCI घेणार मोठा निर्णय! IPL मधील ‘या’ युवा खेळडूंची टीम इंडियात एन्ट्री

Team India | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. आयपीएल संपताचं क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वर्ड टेस्ट चॅम्पियनशिप (Word Test Championship) फायनलकडं लागणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाला वेस्टइंडीज दौऱ्यावर जायचं आहे. या दौऱ्यामध्ये आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Entry of these young players into Team India

वेस्टइंडीज दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला (Team India) 20 जून ते 30 जून या कालावधीमध्ये अफगाणिस्तानमध्ये मालिका खेळायची आहे. या कालावधीमध्ये टीम इंडिया अफगाणिस्तानसोबत एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळू शकते. अफगाणिस्तान दौऱ्यावर आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग आणि तिलक वर्मा या युवा खेळाडूंना टीम इंडिया संधी मिळू शकते.

दरम्यान, संजू सॅमसन आणि राहुल त्रिपाठी यासारखे खेळाडू देखील भारतीय संघाचा (Team India) भाग होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव देखील संघाचा महत्त्वाचा भाग असू शकतो.

भारतीय संघ 12 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान टीम इंडिया  (Team India) 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळणार आहे. या दौऱ्यानंतर टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3owRcqO