InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

तब्बल ५५ वर्षांनी टीम इंडिया करणार पाकिस्तानचा दौरा

- Advertisement -

भारताचा टेनिस संघ डेविस कपमध्ये सहभागी होण्यासाठी तब्बल 55 वर्षांनंतर पाकिस्तानचा दौरा करणार असल्याचे ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे सचिव हिरोन्मय चॅटर्जी यांनी स्पष्ट केले आहे.याबद्दल एएनआयला सांगताना चॅटर्जी म्हणाले, ‘हो आम्ही जाणार आहे. ही द्विपक्षिय मालिका नाही, हा टेनिसचा विश्वचषक आहे. त्यामुळे आम्हाला जावे लागणार आहे. ही एक जागतिक स्पर्धा असल्याने सरकारशी कोणताही संवाद झाला नाही.

आम्हाला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.दरम्यान ते  पुढे म्हणाले की , ‘6 खेळाडूंचा संघ, सपोर्ट स्टाफ आणि प्रशिक्षक पाकिस्तानला जाणार आहेत. मी सुद्धा संघाबरोबर जाणार आहे.आम्ही प्रत्येकासाठी व्हिसा अर्ज करत आहोत. पाकिस्तान हॉकी संघही विश्वचषकासाठी भारतात आला होता आणि आता आम्ही जात आहोत.’

- Advertisement -

2007 नंतर भारतातील कोणत्याही खेळाच्या संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. तसेच डेविस कपमध्ये भारत आणि पाकिस्तान शेवटचे 2006 ला ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई येथे आमने -सामने आले होते. त्यावेळी भारताने 3-2 असा विजय मिळवला होता.ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने डेविस कप खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणारा भारतीय संघ अजून जाहिर केलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.