InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘टीम इंडिया, तुम्ही चांगला प्रयत्न केला’; राहुल गांधींची सेमीफायनल नंतर प्रतिक्रिया

आयसीसी विश्वचषक 2019 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी मात केली आणि फायनलचं तिकीट मिळवलं. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनीही टीम इंडियासाठी ट्वीट केलं. “आजच्या रात्री करोडो भारतीयांची मनं दुखावल्या गेली असतील. मात्र, टीम इंडिया, तुम्ही चांगला प्रयत्न केला. तुम्हाला प्रेम आणि आदर मिळायला हवा”, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं. त्यासोबतच राहुल गांधींनी न्यूझीलंडला त्यांच्या विजयाबाबत शुभेच्छाही दिल्या.’

ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर काल (9 जुलै) न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. मात्र, पावसाने या सामन्यात खोळंबा घातला आणि सामना त्या दिवसापूरता रद्द करावा लागला. त्यानंतर पुन्हा हा सामना खेळवण्यात आला. तेव्हा न्यूझीलंडने भारतासमोर 240 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र, सोपं वाटतं असलेलं हे आव्हान भारतीय संघाला पेललं नाही.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply