‘बंटी और बबली २’चा टिझर रिलीज; सैफ-राणी पुन्हा झळकणार एकत्र

मुंबई : बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बंटी और बबली २’चा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. २००५साली आलेल्या बंटी और बबली या सिनेमात अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन हे बंटी बबलीच्या प्रमुख भुमिकेत होते. मात्र आता बंटी बबली २ मध्ये अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

टिझरची सुरुवात राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांच्यासोबत होते. दोघेही आपल्या लुकला टच अप देत असतात. त्याचवेळी राणी सैफला आपण किती वर्षांनी एकत्र काम करतो ना असे म्हणते. सैफ म्हणतो १२ वर्षांनी त्यावर सैफ सोबत काम करणे मी फार मिस केले असे राणी त्याला म्हणते.

पुढे टीझरमध्ये सैफ आणि राणी एकमेकांच्या लुकचे कौतुक करत असतानाच अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि शार्वरी फ्रेममध्ये येतात. आम्ही सुद्धा शुटसाठी तयार आहोत. त्यावर राणी आणि सैफ त्यांना तुम्ही कोण असे विचारतात त्यावर दोघे आम्ही बंटी और बबली असे सांगतात. राणी इथे बंटी और बबली फक्त आम्हीच आहोत असे म्हणते. तर डिरेक्टर आदित्य चोप्राने स्क्रिप्ट चेंज केल्याचे सांगते.

सिनेमात राणी मुखर्जी आणि सैफ अली खान सोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेत्री शार्वरी देखील दिसणार आहेत. सिनेमा येत्या १९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा