Teeth Care | दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी करा ‘या’ पद्धती फॉलो

Teeth Care | टीम कृषीनामा: स्त्री असा पुरुष प्रत्येकालाच स्वच्छ दात हवे असतात. दात व्यवस्थित असल्यावर व्यक्तिमत्त्वाचा वेगळा प्रभाव पडतो. त्याउलट दात पिवळे असल्यामुळे अनेक लोक हसणे आणि इतरांशी बोलणे टाळतात. दातांची काळजी घेण्यासाठी आणि दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी लोक अनेक उत्पादनांचा वापर करतात. ही उत्पादन दातांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे दातांची काळजी घेण्यासाठी तुम्ही नैसर्गिक पद्धतीचा वापर करू शकतात. दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर करू शकतात. दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही पुढील पद्धतीने मोहरीच्या तेलाचा वापर करू शकतात.

मोहरीचे तेल आणि मीठ (Mustard Oil and Salt for Teeth Care)

मोहरीचे तेल आणि मिठाच्या मदतीने तुम्ही तुमचे दात स्वच्छ करू शकतात. यासाठी तुम्हाला दीड चमचा मोहरीच्या तेलामध्ये एक चिमूट मीठ मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण हलक्या हाताने दातांवर लावावे लागेल. रोज या मिश्रणाचा वापर केल्याने तुमच्या दातावरील पिवळेपणा कमी होऊ शकतो.

मोहरीचे तेल आणि कोमट पाणी (Mustard Oil and Warm Water for Teeth Care) Teeth Care Tips

मोहरीचे तेल आणि कोमट पाणी दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा मोहरी तेलामध्ये एक चमचा कोमट पाणी मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर या मिश्रणाने तुम्हाला तुमचे दात स्वच्छ धुवावे लागेल. या मिश्रणाचा नियमित वापर केल्याने तोंडातून येणारी दुर्गंधी कमी होऊ शकते.

मोहरी आणि हळद (Mustard Oil and Turmeric for Teeth Care) Teeth Care Tips

मोहरी आणि हळदीमध्ये अंटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे दातांना स्वच्छ करण्यासाठी मोहरीचे तेल आणि हळद फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा मोहरीच्या तेलामध्ये दीड चमचा हळद मिसळून घ्यावी लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला तुमच्या दातावर लावावे लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने दातांवरील पिवळेपणा दूर होऊन, दात स्वच्छ होतात.

दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी Teeth Care Tips

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.