Teeth Care | दातांची काळजी घेण्यासाठी करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Teeth Care | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकालाच निरोगी आणि पांढरे दात हवे असतात. दातांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. पिवळ्या दाताच्या समस्येमुळे अनेक लोक उघडपणे हसू शकत नाही. त्याचबरोबर नीट बोलू शकत नाही. त्यामुळे पिवळ्या दातांच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक महागडे पेस्ट आणि पावडर वापरतात. पण ही उत्पादन दातांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे दातांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक उपायांचा वापर करू शकतात. या उपायांच्या मदतीने दात निरोगी आणि पांढरे राहू शकतात. दातांची काळजी घेण्यासाठी तुम्ही पुढील आयुर्वेदिक उपाय करून बघू शकतात.

मोहरीचे तेल आणि मीठ (Mustard oil and salt-For Teeth Care)

मोहरीचे तेल आणि मीठ वापरून दातांवरील पिवळेपणा दूर करता येऊ शकतो. यासाठी तुम्हाला दीड चमचा मिठामध्ये दोन चमचे मोहरीचे तेल मिसळून घ्यावे लागेल. या पेस्टच्या मदतीने तुम्हाला हलक्या हाताने दात स्वच्छ करावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने तोंडातील बॅक्टेरिया दूर होतो आणि त्याचबरोबर दातही चमकू लागतात.

ऑइल पुलिंग (Oil pulling-For Teeth Care)

आजकाल ऑइल पुलिंग ही पद्धत लोकप्रिय होत चालली आहे. ऑइल पुलिंग केल्याने दातातील सर्व बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दातांचा पिवळेपणा सहज दूर होतो. यासाठी तुम्हाला एक चमचा तिळाच्या तेलामध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण दहा मिनिटं तोंडामध्ये ठेवावे लागेल. याचा वापर केल्याने दातांची दुर्गंधी कमी होते आणि दात हळूहळू चमकायला लागतात.

मीठ आणि लिंबू (Salt and lemon-For Teeth Care)

मीठ आणि लिंबाच्या मदतीने दात स्वच्छ करता येऊ शकतात. या दोन्ही गोष्टींमध्ये आढळणारे गुणधर्म दातांवरील पिवळेपणा दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला दीड चमचा मिठामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर या मिश्रणाच्या मदतीने तुम्हाला दात हलक्या हाताने घासावे लागतील. नियमित या मिश्रणाने दात घासल्यावर तुम्हाला तुमच्या दातांमध्ये फरक जाणवेल.

दातांची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील आयुर्वेदिक उपाय करू शकतात. त्याचबरोबर रिकाम्या पोटी कारल्याचा चहा प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

सर्दी-खोकल्याची समस्या दूर होते (The problem of cold and cough is removed-Bitter Gourd Benefits)

रिकाम्या पोटी कारल्याच्या चहाचे सेवन केल्याने सर्दी-खोकल्याची समस्या दूर होऊ शकते. कारण कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फरस आढळून येते, जे सर्दी खोकल्याची समस्या दूर करण्यास मदत करते. तुम्ही जर खोकल्याच्या समस्येपासून त्रस्त असाल तर तुम्ही कारल्याच्या चहाचे सेवन केले पाहिजे.

डायबिटीससाठी फायदेशीर (Beneficial for diabetes-Bitter Gourd Benefits)

तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असाल, तर कारल्याच्या चहाचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या चहाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे शरीर दीर्घकाळ निरोगी राहते. डायबिटीसच्या रुग्णांसाठी सकाळी रिकाम्या पोटी कारल्याच्या चहाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या