Teeth Care Tips | दातांवरील पिवळेपणा दूर करायचा असेल तर ‘या’ पद्धतींचा करा वापर

टीम महाराष्ट्र देशा: आपले दात (Teeth) नेहमी समोरच्या व्यक्तीवर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडतात. कारण सुंदर आणि स्वच्छ दातांसह आपले व्यक्तिमत्व उठून दिसते. त्यामुळे आपण आपल्या दातांची निगा (Care) राखण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. जर दात खूप पिवळे पडले असतील आणि खूप प्रयत्न करूनही त्यांना पांढरेपणा येत नसेल तर आपण त्यावर अनेक उपाय करतो. कारण पांढरे दात कोणत्याही व्यक्तीचे संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते. त्यामुळे आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या वापराने तुम्ही तुमच्या दातावरचा पिवळेपणा कमी करून त्यांना परत चमकदार आणि बनवू शकतात.

दात ( Teeth) वरील पिवळेपणा कमी करण्यासाठी पुढील पावडर वापरा

जर तुमचे दात खूप पिवळे पडले असतील आणि खूप प्रयत्न करून त्यांना पांढरे पण नाही येत नसेल तर तुम्ही ही घरगुती पद्धती वापरून त्यांची चमक परत आणू शकता. त्यासाठी तुम्हाला एक चमचा लवंग पावडर, एक चमचा काळे मीठ, एक चमचा लिकोरीस पावडर, एक चमचा दालचिनी पावडर वाळलेले कडुलिंब आणि पुदिन्याची पाने घेऊन व्यवस्थित मिसळून घ्यावे लागेल. या सर्व गोष्टींची पावडर तयार करून तुम्ही त्यामध्ये मोहरीचे तेल देखील घालू शकता. या तयार केलेल्या पावडरने तुम्ही नियमितपणे दात स्वच्छ केल्याने तुमच्या दातांवरील पिवळेपणाची समस्या लवकरच दूर होईल.

दातावरील पिवळेपणा कमी करण्यासाठी तुम्ही ही टीथ व्हाइटनिंग पावडरचा उपयोग करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ही पावडर ब्रशला लावून व्यवस्थित दात घासावे लागेल. त्यानंतर स्वच्छ पाण्याने ते धुवावे लागेल. नियमितपणे तुम्ही असे केल्यास तुमच्या दातावरील चमक परत येऊन तुमचे दात मजबूत होतील. आणि त्याचबरोबर दातांमधील पोकळी देखील दूर होऊ शकते.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • ही पावडर फक्त सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दातांवर लावा.
  • जेवण झाल्यानंतर किंवा काहीही खाल्ल्यानंतर व्यवस्थितपणे पाण्याने गुळणा करून घ्या. असे केल्याने दातावर कोणत्याही प्रकारचा थर जमा होणार नाही.
  • गुळणा करण्यासाठी तुम्ही कोमट पाणी किंवा पाण्यामध्ये मीठ टाकून ते पाणी वापरू शकता.
  • या पावडरने ब्रश करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हलक्या हाताने दातांवर ब्रश करा कारण जास्त जोरात ब्रश केल्यामुळे हिरड्या सोलयची शक्यता असते.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.