“तेजस ठाकरे माझ्या डोक्याबाहेरचा विषय आहे”

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्त राजकारणी, उद्योजक, मित्र परिवार यांनी त्यांना शुभेच्छा दील्या. मात्र यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तेजस ठाकरेला शुभेच्छा देताना असे काही म्हंटले की ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

तेजस ठाकरे यांना शुभेच्छा किशोरी पेडणेकर यांनी तेजस ठाकरे राजकारणात येणार, असं सुतोवाच केलंय. किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावर आपलं मत मांडलं. तेजस ठाकरे माझ्या डोक्याबाहेरचा विषय आहे. जीवसृष्टी सोडून तो राजकारणात येईल, असं वाटत नाही. याबाबत अंतिम निर्णय ठाकरे कुटुंबीयच घेतील, असं भुजबळ म्हणाले. पण युवकांनी राजकारणात यायला पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

तेजस ठाकरे यांची ओळख ही निसर्गप्रेमी, एक उत्तम फोटोग्राफर, वन्यजीव संशोधक अशी आहे. गोगलगाय, पाली, मासे, साप या प्राण्यांवर त्यानी संशोधन केलं आहे. वन्यजीव संशोधनातील त्यांच्या कार्याची दखल जागतीक पातळीवर घेतली गेली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा