तेलंगणाने दिली शेतकऱ्यांसाठी 24 तास मोफत वीज ; महाराष्ट्रात कधी ?

तेलंगणा सरकारचा शेतकरी हिताचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा: आस्मानी संकटातून शेतकरी वाचला तर त्यावर सुलतानी संकट ओढवत विहिरीत पाणी असून विजेअभावी तो पिकाला देऊ शकत नाही. पण शेतीसाठी आता २४ तास मोफत वीज मिळणार आहे. आणि असं करणारं तेलंगणा देशातील पहिल राज्य ठरलं आहे. तेलंगणा राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

नवीन वर्षाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ही महत्वाची भेट दिली.
31 डिसेंबरला मध्यरात्री 12 वाजून एक मिनिटांनी कृषी पंपांना/ शेतीला 24 तास अखंड आणि मोफत वीजपुरवठा सुरु झाला. अशाप्रकारे शेतीला वीजपुरवठा करणारं तेलंगणा हे देशातलं पहिलं राज्य असल्याचा दावा के. चंद्रशेखर राव यांनी केला.

या उलट महाराष्ट्रात ‘धरण उशाला अन कोरड घशाला’ अशी परिस्थिती झाली झाली आहे. वरूनराज्याने कृपा केली आणि राज्यात मुबलक पाऊस झाला. पण विजेअभावी शेतीला पाणी देता येत नाही त्यामुळे उभी पिके करपली आहे. दुसरीकडे बोण्डअळीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. अशात तेलंगणा राज्याचा आदर्श घेऊन मुख्यमंत्री आणि सरकार राज्यातील शेतकऱ्यांना मदत करणार का असा प्रश्न राज्यातील शेतकरी विचारात आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.