टेनिसपटू लिएंडर पेसने मला फसवलं; महिमा चौधरीने केला खुलासा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिने दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘परदेस’ या चित्रपटातून महिमाने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. तिच्या पहिल्यावहिल्याच चित्रपटाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. मध्यंतरी महिमाचे नाव टेनिसपटू लिएंडर पेसशी जोडले गेले होते. पण लिएंडरने महिमाला फसवले असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या.

एका मुलाखतीमध्ये महिमाने लिएंडर पेसने तिला फसवल्याचा खुलासा केला होता. “लिएंडर एक चांगला टेनिसपटू असेल पण त्याने मला फसवलं आहेे. त्याने माझ्यासोबत योग्य निर्णय घेतला नाही,” असं महिमा म्हणाली.

“माझ्यासाठी हे धक्कादायक नव्हते. जेव्हा मला कळाले की लिएंडर दुसऱ्या एका अभिनेत्रीसोबत फिरत आहे, तेव्हा मी त्याला म्हटले की, तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्यावर परिणाम होणार नाही. मला असे वाटते की त्याने रियासोबतही असेच केले,” असं पुढे महिमा म्हणाली. महिमानंतर लिएंडर रिया पिल्लईला डेट करत होता. त्यानंतर लिएंडरकडून रियाला एक आपत्यही झालं होतं.

सध्या लिएंडर पेस अभिनेत्री किम शर्माला डेट करत आहे. त्यांचे एकत्र गोव्यात फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण दोघांनी अद्याप त्यांच्या रिलेशनशीपवर वक्तव्य केलेल नाही.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा