InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

काश्मीर खोऱ्यात 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; काश्मीर खोरे पेटले

- Advertisement -

जम्मू काश्‍मीरमध्ये ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बंदिपोरा जिल्ह्यात तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर बंदची हाक देण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच नागरिक रस्त्यावर उतरले असून परिसरातील शाळा आणि दुकाने बंद करण्यात आली आहेत. या आंदोलनांमुळे तणाव असून आंदोलकांनी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदिपोरा जिल्ह्यात 9 मे रोजी तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला होता. जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी तपासासाठी विशेष पथक गठीत केले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.