InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

समुद्रामार्गे होऊ शकतो भारतावर दहशतवादी हल्ला – नौदल प्रमुख

- Advertisement -

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला घेताना, भारताने पाकिस्तान हद्दीत घुसून, दहशतवाद्यांचे तळ उध्दवस्त केले होते. भारतावर समुद्रामार्ग दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. याबाबतची शक्यता नौदल प्रमुख सुनिल लांबा यांनी वर्तवली आहे. 

सुनिल लांबा पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, आपण सगळ्यांनीच तीन आठवड्यांपूर्वी दहशतवादी हल्ल्याचे भयानक रूप पाहिले. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना अशा देशाचे समर्थन आहे जो भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला एका अहवाल प्राप्त झाला असून त्यानुसार आपला शेजारील देश समुद्र मार्गाने हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. शिवाय, दहशतवाद्यांना पाकिस्तान पैसा पुरवत आहे. त्यामुळे जगासमोर मोठे आव्हान उभे असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या – 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.