ठाकरे सरकारला सत्तेच्या लालसेपोटी हिंदू सणांचा विसर पडलाय : प्रवीण दरेकर

मुंबई : कोरोनामुळे गेले २ वर्षे झाली सर्व सण उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. आगामी काळात दहीहंडी उत्सवाला मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून विरोधक आता आक्रमक पाहायला मिळत आहे.

पारंपरिक दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारण्यात आल्याने भाजपाने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. भाजपा नेते आणि विधान परिषद विरोध पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडले आहे. राज्य सरकार हिंदू सणांच्या विरोधात आहे. कोरोनाचे गांभीर्य सर्वांना आहे, परंतु ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले, अशा गोविंदाना दहिहंडीकरता परवानगी द्यावी, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली.

पुढे असे झाले नाही तर हे सरकार हिंदू सणाच्या विरोधात आहे, असे लोकांचे मत तयार होईल, अशी टिका दरेकर यांनी केली. तर धार्मिक स्थळे सर्वसामान्यांसाठी का उघडली जात नाहीत? असा सवाल करत दरेकर म्हणाले की, आधी मंदिरे बंद आता आमच्या सणावरदेखील बंदी का? ठाकरे सरकारला सत्तेच्या लालसेपोटी हिंदू सणांचा विसर पडला असल्याची टीका दरेकर यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा