‘ठाकरे सरकार प्रसिद्धीसाठी बॉलिवुडच्या सेलिब्रिटींना लाखो रुपये देतात’

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात चांगलीत जुंपली आहे. लसीकरणाचा काळाबाजार, कोरोना मृतांचा वाढणार आकडा यावरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या पब्लिसीटीसाठी अनेक अभिनेत्यांचा वापर केला जात असल्याच्या आरोप भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे.

आमदार नितेश राणे यांनी ट्विट म्हणाले, राज्य सरकारची स्तूती करण्यासाठी बॉलिवूडच्या अभिनेता, अभिनेत्रींना पैसे दिले जात आहेत. कमी प्रसिध्द सेलिब्रेटींना दोन ते तीन लाख दिले जात आहेत. तर प्रसिद्ध सेलिब्रेटींना यापेक्षा जास्त पैसे दिले जात आहेत. यांना पैसे देऊन राज्य सरकारबद्दल चांगल्या पोस्ट टाकायला सांगितले जाते. तसेच या सेलिब्रेटिंना सेना भवनातून फोनही जातात.

मागील काही दिवसांपासून विरोधी पक्ष राज्य सरकारवर आक्रमकपणे टीका करत असल्याचे दिसत आहे. तसेच आमदार राणे यांनी हा पब्लिसिटीसाठी खर्च होणारा पैसा कर देणाऱ्यांचा असून तो तिकडे खर्च केला जात असल्याचेही ट्विटमध्ये सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा