“देवेंद्र फडणवीस चालू देतील तोपर्यंतच ठाकरे सरकार चालणार”

इंदापूर : राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप सातत्याने करत आहे. भाजप नेत्यांनी सरकार इतक्या दिवसात पडले तितक्या दिवसात पडेल अशी वक्तव्येही केली होती. असेच काहीसे महत्वाचे वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार, असं केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. ते इंदापूर इथे बोलत होते.

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज रवाना झाले. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी ते काही काळ थांबले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असून, महाराष्ट्राची बदनामी देशभर झाली आहे, असं रामदास आठवले म्हणाले.

तब्बल 27 दिवस एनआयएच्या कोठडीत असलेले निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 23 एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालीयन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष एनआयए कोर्टाने दिले आहेत. अँटालिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून आठवलेंनी पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा