“ठाकरे सरकार आता पावसाची जबाबादारीही मोदींवर ढकलेल”

मुंबई : मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईकरांची त्रेधा उडाली आहे. रात्रीपासूनच सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. यावरूनच विरोधकांनी मुंबई महानगरपालिकेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी तर सरकार आता पावसाची जबाबादारीही मोदींवर ढकलेल असा टोला लगावला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“मनपा किंवा राज्य सरकार आता बहुतेक पावसाची जबाबदारीसुद्धा मोदींवर ढकलतील आणि मोदींनीच यातून मार्ग काढावा म्हणतील. एवढं तरी म्हणू नये हीच आमची अपेक्षा आहे. मुंबईच्या आयुक्तांनी आम्हाला विचारलं तर आम्ही त्यांना भ्रष्टाचार कमी करुन आता तरी नालेसफाई नीट करा आणि पाणी साचण्याच्या जागा आहेत तेथील कामं पूर्ण करावीत असं सांगू,” असं अतुल भातखळकर म्हणाले.

“मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नाही. मात्र, चार तासात निचरा झाला नाही तर मात्र आरोप योग्य आहे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या म्हणाल्या आहेत. चार तासाच्या वर पाणी शहरात थांबत नाही, त्यामुळे थोडं थांबणं गरजेचं असल्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा